पनवेल, दि.7 (वार्ताहर) ः येथील प्रसिद्ध विरुपाक्ष मंदिरामधे 24 वा नारदीय कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला. प्रारंभ झालेल्या या सप्ताहाची सांगता रसायनी येथील ह. भ. प. सच्चिदानंद महाराज कांबेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली.

या सप्ताहामधे राज्यभरातील नामांकित कीर्तनकारांनी आपली सेवा सादर केली. यावेळी कीर्तनसेवेसाठी हरिपाठ ही संकल्पना ठरविण्यात आली होती. त्याला अनुसरून कीर्तनकारानी हरिपाठातील अभंगांवर निरुपण व कथाआख्यान सांगितले. नंदकुमार कर्वे यांनी ऑर्गनसाथ, गणेश घाणेकर यांनी तबलासाथ, हिमांशु मते व प्रशांत घरत यांनी मृदुंगसाथ आणि मुक्तानंद कांबेकर, निलेश म्हात्रे, गिरीधर मते यांनी गायनसाथ केली.
