4k समाचार दि. 12
नेरुळ सेक्टर ६ येथील सुश्रुषा रुग्णालयाच्या बेसमेंटमधील सर्व्हर रूमला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच रुग्णालयातील २१ रुग्णांना, ज्यात ४ रुग्ण आयसीयूमध्ये होते, तातडीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या तात्काळ कारवाईमुळे मोठी जीवितहानी टळली.

घटनेत रुग्णालयाचे काही प्रमाणात नुकसान झाले असून, फायर ऑडिट झाले होते का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
