नवीन बातम्या
खारघरवासीयांच्या आग्रहास्तव रंगणार ‘दिवाळी संध्या’!
गायिका आर्या आंबेकर यांच्या सुरेल गीतांची मैफल; कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य
माझं पनवेल’ हे नावच पनवेलकरांमध्ये अभिमानाची भावना निर्माण करते – रामशेठ ठाकूर
माझं पनवेल’च्या १३व्या दिवाळी विशेषांकाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
चांगू काना ठाकूर महाविद्यालयात ‘दिवाळी बाजार’ उत्साहात  विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि उद्योजकीय कौशल्यांना मिळाले व्यासपीठ
माईंडस्पेस फ्युजनच्या ‘फेस्टिव्ह बाजार’ला ५ हजारांहून अधिक नागरिकांची भेट खरेदी, खाद्यपदार्थ, संगीत आणि कलाविष्कारांनी दोन दिवसीय महोत्सवात रंगत
संतोष भगत यांच्याकडून यंदाही मुलांना फटाक्यांचे वाटप
फटाके भेट देत चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलविला दिवाळीचा आनंद
दिवाळीचा आनंद साजरा करा, पण सुरक्षिततेला प्राधान्य द्या!  घरफोडी, चोरी आणि सायबर फसवणूक टाळण्यासाठी कामोठेकरांनी सतर्क राहावे; वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देशमुख यांचे आवाहन
महिनाभरात पैसे दुप्पट करण्याचे आमिष; चार जणांना ७२.९८ लाखांचा गंडा उरणमधील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल
औषध प्रशासनाच्या तपासणी मोहिमेला वेग; ऑक्टोबरमध्ये ५४४ नियामक कारवाया
११ ठिकाणी छापे; १.३४ कोटींचा औषधे व सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त, चौघांना अटक
महागाईच्या पार्श्वभूमीवर रेशनमधून दिलासा द्या; शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पात्र केशरी कार्डधारकांना मोफत धान्य, बंद रेशनकार्डे पूर्ववत सुरू करण्याची मागणी

रेल्वेत नोकरी लावतो असे सांगून जवळपास साडे एकोणीस लाख रुपये लुबाडणारा सराईत भामटा अटकेत


पनवेल, दि.16 (संजय कदम) ः रेल्वे मध्ये सरकारी नोकरीत लावतो असे सांगून इच्छुक इसमासह त्याच्या आईची फसवणूक करून नोेकरीचे आमिष दाखवून जवळपास 19 लाख 42 हजार रुपये वेगवेगळ्या कारणाने उकाळणार्‍या एका सराईत भामट्यास अखेरीस पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले असून यापूर्वी सुद्धा त्याने अशाच प्रकारे कित्येक लोकांना फसविल्याचे अधिक तपासात निष्पन्न झाले आहे.


पनवेल शहरात राहणारा एक इसमाला फेसबुकवर नोेकरी शोेधत असताना फेसबुक जॉब अड्डा येथे रेल्वेत नोकरी लावून देण्याची जाहिरात बघितली. त्यानुसार त्याने आरोपी अक्षय कलंगुटकर याच्याशी संपर्क साधला. त्याने रेल्वेत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून त्याकरिता मेडीकलसाठी टॅक्सचा फॉर्म भरण्याकरिता फॅमिली डिक्लेरेशन, नॅशनल पेन्शन कर्ता तसेच विविध कारणे दाखवून त्याला तसेच त्याच्या आईकडून त्याचप्रमाणे स्वतःच खोटा बॉस उभा करून त्याने या दोघांकडून विविध कारणे दाखवून आतापर्यंत 19 लाख 42 हजार रुपये त्यांच्याकडून उकळले होते. 

आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच सदर इसमाने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता वपोनि नितीन ठाकरे व पो.नि.शाकीर पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभय कदम, पोलीस हवालदार धीरज थवई, पोलीस कॉन्स्टेबल अभय मेर्‍या, पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद घरत, पोलीस हवालदार वैभव शिंदे झोन 2 पनवेल आदींनी तांत्रिक तपास सुरू केला असता तो सीबीडी येथील एका ढाब्यावर दारु पित असल्याचे निष्पन्न झाल्याने या पथकाने जावून त्याला तेथून ताब्यात घेतले.

अधिक तपासात त्याने अशाच प्रकारे नेरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका व्यक्तीला 17 लाखाला तर रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका व्यक्तीला 75 लाखाला फसवणूक केल्याचे व याबद्दल त्याला अटक झाल्याने तो नुकताच जेलमधून सुटला असताना त्याने अशा प्रकारे पुन्हा एकदा जाहिरात देवून या दोघांची फसवणूक केली होती. परंतु पनवेल शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा आरोपी अखेरीस गजाआड झाला आहे. त्याच्या खात्यात जमा होणारे पैसे हे तो नेहमी दारु, बिंगो व जुगारात उडवत असे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभय कदम करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top