नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात आढळला मृतदेह


पनवेल, दि.16 (संजय कदम) ः पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षा स्टॅण्डच्या फुटपाथवरील बाकड्यावर सेक्टर नं.15, नवीन पनवेल या ठिकाणी एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध खांदेश्‍वर पोलीस करीत आहेत. 


सदर अनोळखी इसमाचे अंदाजे वय 45 ते 50 वर्षे, रंग गहुवर्णीय, डोक्याचे केस काळे पांढरे, उंची 5 फुट, शरीर सडपातळ, नाक सरळ, दाढी पांढरी काळी बारीक, अंगात पांढरा हाफ टी-शर्ट व त्यावर पुढील बाजूस जय भोले व शंकराचे चित्र आहे. तसेच निळसर रंगाचा मळकट बरमुडा, गळ्यात पंचरंगी धागा बांधलेला आहे. 

उजव्या हाताच्या पोटरीवर मंगेश व बदाम गोंदलेले आहे. तसेच दंडावर हनुमानाचे चित्र गोंदलेले आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्याने खांदेश्‍वर पोलीस ठाणे किंवा सहा.पो.नि.पांडुरंग घागरे यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top