पनवेल दि. २७ 4k समाचार( संजय कदम ) : काळुंद्री नदीच्या किनारी, कोळखे गावाच्या पाठीमागील बाजुस येथे नदीच्या पाण्यामध्ये तरंगताना एका इसमाचा मृतदेह मिळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत .

सदर अनोळखी बेवारस इसमाचे वय ३५ ते ४० वर्षे, डोक्यावर केस काळे, तोंड उघडे जिभ बाहेर, आलेली, डोळे बाहेर आलेले, दाढी काळी व बारिक वाढलेली दिसत आहेत. बांधा मध्यम, उंची अंदाजे ५ फुट ७ इंच आहे . या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका झांझुर्णे यांच्याशी संपर्क साधावा .
