महाराष्ट्रात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठरला आहे. पण त्याची नावे जाहिर झालेली नाहीत. त्यातच आता मंत्रीपदासाठी इच्छुक असणाऱ्यांचे रिपोर्ड कार्ड केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मागवले आहे.

यात आमदाराने लोकसभा, विधानसभेच महायुतीचे काम प्रमाणिकपणे केले का? निवडणुकीवेळी परफॉर्मन्स कसा होता? माजी मंत्री पुन्हा इच्छुक असेल तर त्याने मंत्रालयात कसे आणि किती वेळ काम केले?

यासह अनेक बाबी तपासल्या जाणार आहेत. त्यामुळे आता महायुतीतील मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांचं टेन्शन वाढलंय.
