नवीन बातम्या
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची दशकपुर्ती निमीत्त   रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार  
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिन” निमित्त ब्रह्माकुमारीज पनवेल आणि पनवेल महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम



उरण दि ३०(विठ्ठल ममताबादे )३१ मे रोजी साजरा होणाऱ्या जागतिक तंबाखू विरोधी दिन (World No Tobacco Day) निमित्त ब्रह्माकुमारीज पनवेल सेवाकेंद्राच्या वतीने आणि पनवेल महानगरपालिकेच्या सहकार्याने “आंतरराष्ट्रीय तंबाखू जनजागृती अभियान” अंतर्गत एक विशेष व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम ३० मे २०२५ रोजी जेष्ठ नागरिक सभागृह,सीनियर सिटिझन हॉल,
ठाणे नाका रोड, ओल्ड पनवेल येथे आयोजित करण्यात आला होता.




या कार्यक्रमाचा उद्देश तंबाखूसह सर्व प्रकारच्या व्यसनांचे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक स्तरावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगणे व जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे हा होता.


या उपक्रमात पनवेल महानगरपालिकेचे सुमारे २५० कर्मचारी, यामध्ये आशा वर्कर्स, डॉक्टर, नर्सेस यांनी सक्रिय सहभाग घेतला.



कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक होते डॉ. सचिन परब (MBBS), जे ब्रह्माकुमारीज संस्थेशी संलग्न असून प्रसिद्ध हिप्नोथेरपिस्ट, काउन्सेलर आणि कॉर्पोरेट ट्रेनर आहेत. त्यांनी आजवर अनेक व्यसनमुक्ती शिबिरे यशस्वीपणे पार पाडली असून त्यांना महाराष्ट्र शासनाचा “महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार” देखील प्राप्त झाला आहे.ते “ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन टोबॅको अवेअरनेस” या आंतरराष्ट्रीय उपक्रमाचे प्रोजेक्ट डायरेक्टर असून “माय इंडिया – अ‍ॅडिक्शन फ्री इंडिया” या राष्ट्रीय मोहिमेचे नॅशनल को-ऑर्डिनेटर देखील आहेत.



डॉ. परब यांनी व्यसनामुळे होणारे वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक नुकसान समजावून देत, व्यसनमुक्तीची प्रेरणा दिली. त्यांच्या प्रभावी सत्रानंतर सर्व सहभागी सदस्यांनी आपल्या घर, कार्यस्थळ, शहर, राज्य, देश आणि अखेर संपूर्ण जग व्यसनमुक्त करण्याची प्रतिज्ञा घेतली.

कार्यक्रमाच्या शेवटी ब्रह्माकुमारीज पनवेल सेवाकेंद्रात चालणाऱ्या सात दिवसांच्या मोफत राजयोग ध्यान अभ्यासक्रमाची माहिती देण्यात आली. तसेच, इच्छुकांना डॉ. परब यांच्याकडून मोफत समुपदेशनाची सुविधा देखील उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. या सेवेसाठी आवश्यक संपर्क क्रमांक उपस्थितांना प्रदान करण्यात आले.



संपूर्ण कार्यक्रम उत्साहात पार पडला असून “तंबाखू मुक्त भारत” घडविण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकले गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top