4k समाचार दि. 7
पनवेल : पनवेल नगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती उमेश पोद्दार यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी माजी खासदार व लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उमेश पोद्दार यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तसेच भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्यासह अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी उमेश पोद्दार यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहवर्धक आणि आनंददायी होते.
