नवीन बातम्या
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण मधील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या जाहीर. उरण शहर संघटक पदी  विजय दिलीप जाधव, उपशहरप्रमुख पदी फते खान सोंडे व युवती सेना उरण तालुका संघटिका पदी कु. नेहा रुपेश भगत यांची नियुक्ती.
करंजाडेच्या विकासासाठी आणखी एक ठोस पाऊल!
*केदार भगत यांच्या पुढाकाराने कोळेश्वर विद्यामंदिरात रेनकोट व छत्री वाटप*
*आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडून आयोजनाचे विशेष कौतुक*
माची प्रबळगडावर रस्ता चुकलेल्या दोन अल्पवयीन पर्यटकांची सुखरूप सुटका.
रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान होणार
पनवेलमध्ये ‘महारोजगार मेळावा २०२६’ला हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांनी घेतला लाभ
उरण महाविद्यालयात जपानी भाषा  प्रशिक्षणाची सुरुवात.
महाराष्ट्रातील २७+६ ओबीसी जातींच्या केंद्राच्या यादीतील समावेशासाठी दिल्लीत जोरदार पाठपुरावा. महाराष्ट्र ओबीसी कृती समिती व पवार मिशनचा तीन दिवसीय दौरा यशस्वी.
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात मे. अमेया कंपनीतील कामगारांना ७२०० रुपये पगारवाढ. न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचा या वर्षातील ९ वा पगारवाढीचा करार.

सर्वसामान्य ग्रामस्थांना देखील करता येणार थाटात विवाह सोहळा 
थ्री स्टार राज रिसॉर्ट यांचा स्तुत्य पुढाकार


4kNews कामोठे दि 10
पनवेल/ प्रतिनिधी
पनवेल तालुक्यातील उसर्लि बुद्रुक येथे असलेल्या थ्री स्टार राज रिसॉर्ट यांच्या वतीने पनवेल शहर व आजूबाजूच्या गावातील रहिवाशांसाठी एक स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे. सर्वसामान्य रहिवाशांना देखील थाटामध्ये विवाह सोहळा साजरा करता यावा या उद्देशाने स्थानिक रहिवाशांसाठी अत्यल्प शुल्कामध्ये रॉयल वेडिंग प्लॅन लाँच करण्यात आला आहे. बजेट फ्रेंडली पॅकेज मुळे कित्येक गरजवंत कुटुंबांचे थाटात लग्न करण्याचे स्वप्न त्यामुळे पूर्ण होणार आहेत. 


  याबाबत प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना राज रिसॉर्टचे संस्थापक तथा मुख्य संचालक, माजी नगरसेवक संतोष उरणकर म्हणाले की अवघ्या ५० हजार रुपयात आम्ही ८०० लोकांची क्षमता असलेले प्रशस्त हिरवेगार मॅरेज लॉन आणि त्यासोबत वधू पक्ष आणि वरपक्ष यांना प्रशस्त वातानुकूलित रूम्स ऑफर करत आहोत. अवघ्या १ लाख रुपयांत स्वागत समारंभासाठी आकर्षक स्टेज सजावट,अप्रतिम एन्ट्री गेट, बुफे सेटअप,३०० खुर्च्या,१५ टेबल, संपूर्ण लॉन परिसराला मिरची लाईट आणि रॉयल हॅलोजन प्रकाशयोजना, डी जे संगीत सिस्टीम,२ कुलर, वेलकम बोर्ड अशा दणकेबाज सुविधा मिळतील.ते पुढे म्हणाले की ताजे व लजीझ भोजन व्यवस्थादेखील आम्ही या पॅकेज मध्ये ऑफर करत आहोत. यामध्ये ग्राहकांच्या पसंतीची दोन ज्यूस, ग्राहकांच्या पसंतीच्या दोन भाज्या, चपाती, पुरी, दाल तडका, पुलाव,जीरा राईस, गुलाब जाम, आईस क्रीम, मिनरल ड्रिंकिंग वॉटर आणि मुखवास असे परिपूर्ण भोजन अवघ्या माणशी ५०० रुपयांमध्ये मिळणार आहे.


 वास्तविक सध्या पनवेल ग्रामीण परिसरामध्ये विवाह सोहळा करण्यासाठी एखाद्या शेतामध्ये जेसीबी लावून लेव्हल करावी लागते. या ठिकाणी विवाह सोहळा करण्यासाठी मंडप डेकोरेशन आणि बुफे सेटअप यासाठी खर्च करावा लागतो. इतके सगळे केले तरी धुळीचा त्रास होतो तसेच एप्रिल आणि मे महिन्यात प्रचंड गर्मीचा जाच सहन करावा लागतो. खर्च करून देखील थाटात विवाह सोहळा केल्याचे सुख तिथे कुटुंबांना मिळत नाही.पनवेल शहरात देखील थाटात विवाह सोहळा आयोजित करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले आहे.


अशा समस्त कुटुंबीयांसाठी थ्री स्टार राज रिसॉर्ट यांची बजेट फ्रेंडली वेडिंग प्लॅन ही ऑफर खरोखरच वरदान ठरणार आहे.
   नुकतेच राज रिसॉर्ट ला थ्री स्टार दर्जा मिळालेला आहे. या ठिकाणी डेडिकेटेड रेस्टॉरंट ग्राहकांच्या सेवेत रुजू असून प्रशस्त स्विमिंग पूल मुळे इथे एक आरोमॅटीक व्हेकेशन फील येतो त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पाहुणेदेखील राज रिसॉर्टची निवड करत असतात. आशा आलिशान ठिकाणी थाटामध्ये लग्न करायला मिळणे ही खरोखरच पनवेल शहर आणि आजूबाजूच्या गावातील रहिवाशांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ९८१९३४४१११,९८१९३४४२२२
या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संचालकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top