4k समाचार
उरण दि ४ (विठ्ठल ममताबादे )युवासेना हे शिवसेनेचे महत्वाचे अंग आहे.शिवसेनेत युवा सेनेला, युवा सेनेच्या कार्याला अत्यंत महत्वाचे स्थान आहे. मात्र शिवसेना(शिंदे गट )पक्षाचे आदेश मोडून पक्षाचे नियम पायदळी तुडवीणाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात आल्याने युवा सेनेत खुप मोठी खळबळ माजली आहे.युवासेनेच्या ठाणे येथील महत्त्वपूर्ण बैठकीत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या काही स्वयंघोषित पदाधिकाऱ्यांना त्यांची पदे बरखास्त करून थेट संघटनेबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

पनवेल आणि उरण विधानसभा क्षेत्रातील युवासेना पदाधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसांत संघटनेच्या धोरणाविरुद्ध जाणाऱ्या हालचाली केल्या आहेत. त्यांचे वर्तन हे पक्षविरोधी ठरले. यामुळे युवासेनेची प्रतिमा धुळीस मिळण्याचा धोका निर्माण झाला होता. याची दखल घेत शिवसेना शिंदे गटाचे युवासेनेचे विभागीय सचिव (कोकण विभाग) रूपेश पाटील यांच्यासह पनवेल विधानसभा व विधानसभा क्षेत्रातील सर्व युवासेना पदाधिकारी यांना तात्काळ बरखास्त केल्याची अधिकृत घोषणा युवासेनेचे मुख्य सचिव राहुल लोंढे यांनी केली.युवासेनेत शिस्त हीच ओळख आहे.आणि शिस्त मोडणाऱ्यांना कुठेही जागा नाही, हे पुन्हा एकदा या निर्णयातून स्पष्ट झालें आहे.

कोकणात या निर्णयामुळे संघटनात खळबळ माजली आहे. युवासेना पक्षशिस्त म्हणजे आदेश! आदेश म्हणजे शिवसेनेचा आत्मा ! हा आत्मा दुखावणाऱ्यांना आता कोणताही राजकीय वरदहस्त उरणार नाही, हे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेस सरनाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.यापूढे प्रामाणिकपणे, एकनिष्ठ राहून आदेशानुसार काम केले व पक्ष शिस्त पाळली तरच त्यांना युवा सेनेच्या पदावर ठेवले जाणार आहे असा संदेश या घटनेवरून अधोरेखित झाला आहे.
