4k समाचार दि. 10
पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्र सिख समाजाच्या ११ सदस्यीय वेल्फेअर कमिटीचे प्रमुख भाई जसपालसिंह सिद्धू यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नरीमन पॉइंट, मुंबई येथील ‘भारत रत्न’ राजीव गांधी इन्श्टिट्यूट येथे भेट घेतली. या भेटीत सिख समाजाच्या अग्नी बंजारा, लबाना आणि सिक्खलिंगायत बंधूंबाबत संबंधित भटक्या जातीच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले.या प्रसंगी भाई हरनामसिंह खालसा, हॅपी सिंग सदस्य महाराष्ट्र राज्य अल्पसंख्य आयोग आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी मिळून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला आणि आभार मानले.

भेटीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिख समाजाशी निगडित विविध प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेतली. भाई जसपालसिंह सिद्धू यांनी सांगितले की, ही भेट केवळ विकास व कामकाजापुरती मर्यादित नव्हती, तर महाराष्ट्र सिख समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी ऐतिहासिक ठरणारी ठरली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या सहकार्यामुळे लबाना आणि सिक्ख लिंगायत समाजाच्या आरक्षणासंबंधीच्या समस्या सुटल्या आहेत.

समाजाच्या हितासाठी घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे भावी पिढ्यांना शिक्षण, नोकरी आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. भाई जसपालसिंह सिद्धू म्हणाले की, “ही केवळ सुरुवात आहे. महाराष्ट्र सिख समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही वचनबद्ध आहोत.” त्यांनी विशेषत: हे अधोरेखित केले की, २०२४ पासून महाराष्ट्र सिख समाजाच्या गरजा व प्रश्न सोडविण्यासाठी कार्यवाही गतीमान होईल.
