नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये ‘राज्य निवडणूक समन्वयक’ म्हणून विशेष जबाबदारी

पनवेल दि.१५ (वार्ताहर) : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. नगरपालिका, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व महानगरपालिका अशा सर्वच निवडणुका टप्प्याटप्प्याने आता घेतल्या जाणार आहेत. या महत्त्वपूर्ण निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीने राज्यस्तरीय निवडणूक संचालन समिती आता घोषित केली आहे. या महत्त्वपूर्ण महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये आमदार विक्रांत पाटील यांना निवडणूक ‘राज्य निवडणूक समन्वयक’ ही महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.

प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण व राज्य निवडणूक प्रभारी व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही राज्यस्तरीय निवडणूक संचालन समिती घोषित करत अनेक नेते व पदाधिकारी यांना निवडणुकी संदर्भातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. यापूर्वी आमदार विक्रांत पाटील यांनी अशा अनेक महत्त्वपूर्ण संघटनात्मक आणि निवडणुकीसंदर्भातील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या असल्याने या आगामी निवडणुकांमध्येही त्यांना ही महत्त्वपूर्ण ‘राज्य निवडणूक समन्वयक’ ही जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्त्यांसाठीच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे या निवडणुकांचे एक विशेष महत्त्व आहे. भारतीय जनता पार्टी प्रत्येक निवडणूक ही नियोजनबद्ध पद्धतीनेच लढत असते.

आता आगामी निवडणुकांमध्ये विजय संपादित करण्यासाठी भारतीय जनता पार्टी सज्ज झाली आहे. या राज्यस्तरीय निवडणूक संचालन समितीमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महासचिव तथा विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांची नियुक्ती घोषित होतात शेकडो कार्यकर्ते व हितचिंतक यांनी शुभेच्छा देत समाधान व्यक्त केले आहे आणि आ.विक्रांत पाटील हे त्यांच्या संघटन कौशल्य व मेहनतीने या महत्वपूर्ण जबाबदारीला उचित न्याय देतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

फोटो : आमदार विक्रांत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top