नवीन बातम्या
ठाकूर कुटुंबीयांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी बाप्पाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना
पनवेलमध्ये कोळी परिवाराच्या गणेशोत्सवात ‘श्री नरसिंह अवतार’ देखावा भाविकांचे आकर्षण
वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी बांधवांसोबत स्नेहभोजन
आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड
एस. एस. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये फायर अवेअरनेस प्रोग्राम आगीच्या दुर्घटनेपासून बचावासाठी विद्यार्थ्यांना अग्निशमन विभागाचे प्रशिक्षण
उरणच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा २५६ कुटुंबांची यादी अंतिम करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश; ४० वर्षांच्या संघर्षाला निर्णायक दिशा
शैक्षणिक नवोपक्रमांची राज्यस्तरावर दखल
शर्मिला महेंद्र गावंड यांना ‘शिवभूमी आदर्श शिक्षक पुरस्कार’
गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी माणुसकीचा पुढाकार!
वैभव कडू यांचा स्वखर्चातून समुद्रकिनारी विसर्जन मार्ग मोकळा

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर रायगडची जबाबदारी!; लोकनेते रामशेठ ठाकूर उत्तर रायगडचे निवडणूक प्रमुख

4k समाचार दि. 6

पनवेल (प्रतिनिधी) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेले आहेत. सर्वात अगोदर नगरपरिषदा आणि नगरपालिकेसाठी पुढील महिन्यात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर रायगडचे निवडणूक प्रमुख म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची आणि संपूर्ण रायगडचे निवडणूक प्रभारी म्हणून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची पक्षाने नियुक्ती केली आहे. निवडणूक व्यवस्थापनामध्ये त्यांचा हातखंडा असल्याने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आ.ठाकूर यांच्यावर हि जबाबदारी सोपवली आहे.


कोरोना आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. परंतु जानेवारी महिन्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार मंगळवारी महाराष्ट्र निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन नगरपरिषदा आणि नगरपालिका निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार
रायगड जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, मुरूड-जंजिरा, पेण, उरण, कर्जत, माथेरान, रोहा, श्रीवर्धन व महाड मध्ये नगरपालिकांसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि पनवेल महानगरपालिकेची रणधुमाळी होणार आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणात राजकीय स्थित्यंतरे झाल्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षांच्या आशा पल्लवी झाल्या आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पक्ष सुद्धा आघाडीवर आहे. 

या पक्षाची सर्वच तालुक्यांमध्ये ताकद वाढलेले आहे. रवींद्र चव्हाण यांच्याकडे रायगडचे पालकमंत्री पद होते. त्यामुळे या जिल्ह्यावर त्यांचे विशेष लक्ष आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला चांगले यश मिळावे या उद्देशाने त्यांनी आपले अत्यंत विश्वासू सहकारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर जिल्हा प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे २००४ पासून निवडणूक व्यवस्थापनाचा मोठा अनुभव आहे. मायक्रो प्लॅनिंग मध्ये त्यांचा हातखंडा आहे. त्याचबरोबर आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून अत्यंत प्रभावीपणे काम केले. त्यांनी आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली. पक्ष संघटना वाढीच्या दृष्टिकोनातून त्यांची कामगिरी उजवी ठरली. त्यांच्या कार्यकाळात भाजप रायगडमध्ये विस्तारला गेला. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी जिल्हा प्रभारी म्हणून प्रदेशाध्यक्षांनी निवड केली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top