उरण दि २4(विठ्ठल ममताबादे )
उरण तालुक्यातील खोपटे येथील पिकत्या जमिनी ऑल कार्गो कंपनीने कवडीमोल भावाने संपादित केली आहे स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी ऑल कार्गो कंपनीने संपादित केली असली तरी या कंपनीत नोकरीत व इतर गोष्टींमध्ये स्थानिक पुत्रांना प्राधान्य न देता इतर व्यक्तींना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक भूमिपुत्र असलेल्या बेरोजगार तरुणांनी एकत्र येत सोनखार बाधित प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना खोपटेच्या माध्यमातून दिनांक २४ /७/२०२५ रोजी सकाळी ११ वाजता स्थानिक प्रकल्पग्रस्त बेरोजगार तरुण खोपटे गावाजवळ असलेल्या ऑल कार्गो कंपनीच्या गेट समोर गेट बंद आंदोलन करणार आहेत.

प्रकल्पग्रस्तांना यार्ड सर्वेअर आणि हाऊस किपींग(झाडू खात्या)मध्ये नोकरी मिळाव्यात तसेच ऑलकार्गो कंपनी लॉजिस्टिक मध्ये १४ प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्या संदर्भात हे गेट बंद आंदोलन आयोजन करण्यात आले आहे सामाजिक कार्यकर्ते अजित कृष्णा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात सोनखारबाधित प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना खोपटेचे अध्यक्ष जयराम ठाकूर, उपाध्यक्ष रुपेश ठाकूर, सेक्रेटरी हरिचंद्र खारकर, खजिनदार गणेश ठाकूर तसेच संघटनेचे पदाधिकारी सदस्य,स्थानिक बेरोजगार भूमिपुत्र मोठ्या संघटने सहभागी होणार आहेत. जोपर्यंत सर्व मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही.आंदोलनच्या दरम्यान आंदोलन स्थळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वीपणे ऑल कोर्गो कंपनी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा सोनखार बाधित प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना खोपटे यांनी कंपनी प्रशासना दिला आहे.

या संदर्भात सोनखार बाधित प्रकल्प शेतकरी संघटना खोपटेने उरणचे तहसीलदार उद्धव कदम, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ, ऑल कोर्गो कंपनी प्रशासन यांच्या सोबत पत्रव्यवहार देखील केला आहे. पण कोणताही सकारात्मक प्रतिसाद ऑल कोर्गो कंपनी प्रशासनातर्फे मिळाले नसल्याने कंपनीच्या गेट समोरच कंपनीचे गेट बंद करून आंदोलन करण्याचा निर्णय सोनखार बाधित प्रकल्प शेतकरी संघटना खोपटेने घेतले असल्याची माहिती अध्यक्ष जयराम ठाकूर यांनी दिली आहे. खोपटे गावातील तमाम नागरिकांनी या आंदोलनात उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करण्यास सहकार्य करावे असे आवाहन सोनखार बाधित प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटना खोपटे तर्फे करण्यात आले आहे.
