(4kNews)
सालाबादप्रमाणे याही वर्षी पनवेलमध्ये संविधान महोत्सव समितीच्या माध्यमातून २३ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर असा ११ दिवसांचा संविधान महोत्सव सेक्टर ५अ, नवीन पनवेल, येथील गुरुद्वारा जवळील मैदानात जल्लोषात पार पडला.

यात संविधान समजून सांगणाऱ्या बौद्धिक गोष्टी, कलाप्रदर्शन आणि विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, त्याचसोबत रोषणाई, सांस्कृतिक प्रबोधन, मान्यवरांची व्याख्याने असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
तसेच संविधान कट्टा, संविधान गार्डन, संविधान चौक आणि संविधान घराची प्रतिकृती संविधान महोत्सवामध्ये मांडली होती.

संविधान निर्मितीची प्रक्रिया सांगणारे संविधान संवाद दालन या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले.
तसेच सविधान महोत्सवात चित्रकला, वकृत्व, निबंध, गायन, नृत्य, वेशभूषा, रील मेकिंग, भीतीचित्र (पोस्टर) आणि ५ कि.मी. मॅरेथॉन अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

या संविधान महोत्सवात विशेष उपस्थिती म्हणून लोकशाहीर संभाजी भगत, ह. भ. प. श्यामसुंदर सोन्नर महाराज, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रफिक सय्यद पारनेरकर, आर.टी.ओ अधिकारी श्री नरेंद्र औटी, शिक्षण चळवळीतील कार्यकर्ते जालिंदर सरोदे, सुजाता पाटील, प्रसाद म्हात्रे, माणुसकीच्या शाळेचे सूत्रधार शिवाजीराव नाईकवाडी,
फोर्स वन कमांडो गौरव इंगोले, संविधान अभ्यासक विनीता सिंग, बाल कल्याण समिती सदस्य (रायगड)
डॉ. विशाल गाणार
ऍड. शुभांगी झेमसे
आणि राम म्हस्के आणि जे. एन. पि. टी.पोर्टचे अधिकारी आर. आर. गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते..

सविधान महोत्सव दरम्यान
विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम खालील प्रमाणे:-
१) ‘संविधान की बात कठपुतली के साथ’ कठपुतली नाटय.
२) नाटिका ‘कपिलेने घेतला झोका’
३) पथनाट्य ‘गणा धाव रे’, ‘हाताची घडी तोंडावर बोट’ आणि ‘मस्त चाललय आमच!’
४)प्रबोधन कला मंच (सांस्कृतिक कार्यक्रम)
५) युगक्रांती”
सांस्कृतिक युवा मंच
(सांस्कृतिक कार्यक्रम)
६) शिक्षण परिसंवाद
७) रिंगण नाट्य
‘सॉक्रेटिस ते दाभोळकर पानसरे व्हाया तुकाराम ‘
८) नाटिका:- रमाबाईच्या मनातलं.
९) प्रवचन:- संत साहित्य आणि संविधान
१०) आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर

हा संविधान महोत्सव यशस्वी करण्यासाठी
सर्व नागरिकांनी आप-आपल्या संस्था/ संघटन आणि राजकीय पक्ष बाजूला ठेऊन भारतीय नागरिक म्हणून स्वेच्छेने योगदान दिले.संविधान महोत्सव समितीच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.
