नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून मराठी अर्थशास्त्र परिषदेला २० लाख रुपयाची देणगी

पनवेल (प्रतिनिधी) समाजाच्या हितासाठी अखंडपणे सामाजिक कार्य करणारे आणि कायम सामाजिक बांधिलकी जपणारे दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मराठी अर्थशास्त्र परिषदेला २० लाख रुपयाची देणगी दिली. 

  मराठी अर्थशास्त्र परिषद ही अर्थशास्त्र ज्ञान मराठी भाषेतून जनमानसात घेऊन जाण्याच्या दृष्टीने मागील ४७ वर्ष पासून वर्षापासून अविरतपणे कार्यरत आहे. हे कार्य करीत असताना महाराष्ट्रातील विविध शहरात दरवर्षी अधिवेशन भरवले जाते परिषदेच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन ही केले जाते. याच परिषदेला प्रोत्साहन मिळावे याकरिता लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी मराठी अर्थशास्त्र परिषदेला वीस लाख रुपयांचे  अर्थसहाय्य केले आहे.

आज (बुधवारी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी २० लाखाचा धनादेश मराठी अर्थशास्त्र परिषदेला सुपूर्द केला. 
  यावेळी परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ. अनिल कुमार वावरे, कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉ. अविनाश निकम, खजिनदार डॉ. मारोती तेगमपुरे, परिषदेचे कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉ. बाळासाहेब पाटील, डॉ. संजय धोंडे, प्राध्यापक काकासाहेब ढवळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मातोश्री भागुबाई चांगु ठाकूर यांच्या नावाने परिषदेकडून पारितोषिके आणि व्याख्यानमाला चालवण्याच्या सद्हेतूने भरीव निधी परिषदेला देण्यात आला आहे

अशी माहिती परिषदेचे खजिनदार डॉ.  मारोती तेगमपुरे यांनी दिली आहे तसेच त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top