नवीन बातम्या
कामोठे सेक्टर १७ मध्ये उघड्या डीपींमुळे जीविताला धोका!
महाविकास आघाडीच्या नगरसेविका आर्या प्रवीण जाधव यांची मागणी; दिवाळीत मुलांसाठी ‘अलबत्या गलबत्या’ नाटक मोफत दाखवा! मोबाईलच्या वाढत्या वापरातून मुलांना रंगभूमीकडे वळविण्यासाठी महापौर आणि आयुक्तांना निवेदन
‘व्होट बचाओ, देश बचाओ’ आंदोलनातून काँग्रेसचा एल्गार मतदानाचा अधिकार आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी पनवेलमध्ये निदर्शने; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी
हृदयाच्या मागील बाजूची १८ सेंटीमीटरची थायरॉईडची गाठ शस्त्रक्रियेद्वारे काढली मेडिकव्हर रुग्णालयात १० तासांची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी; दोन वर्षांपासून श्वासोच्छ्वासाच्या त्रासाने त्रस्त महिलेला दिलासा
पनवेलमध्ये आधुनिक क्रिकेट मैदानासाठी १.२६ कोटींचा प्रस्ताव! क्रिकेटला गतवैभव मिळवून देण्यासाठी नगरसेवक सुमित झुंजारराव यांचा पुढाकार; सात ते आठ संघांना सरावाची सुविधा मिळणार
प्रा. चंद्रकांत मढवी आणि गणेश कोळी यांना रामशेठ ठाकूर यांच्या शुभेच्छा
पनवेल एसटी स्थानकात पिण्याच्या पाण्यासाठी प्रवाशांची वणवण!
फेरीवाल्यांवर कारवाई, बड्या व्यावसायिकांना अभय का? लीना गरड यांचा महासभेत संतप्त सवाल
वडिलांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती, तर मुलाने युरोपमध्ये मिळवली मास्टर डिग्री; अहिरे कुटुंबाचा दुहेरी गौरव

पनवेल एसटी स्थानकात पिण्याच्या पाण्यासाठी प्रवाशांची वणवण!

4kNews कामोठे

विकतच्या बाटल्यांवर तहान भागवण्याची वेळ; मूलभूत सुविधेकडे एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष
पनवेल, दि.  31 (वार्ताहर) : राज्यातील विविध भागांतून ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या पनवेल एसटी बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याची तक्रार प्रवाशांकडून होत आहे. बसची प्रतीक्षा करताना पाणी उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना विकतच्या बाटल्या घेऊन तहान भागवावी लागत आहे. 



या गैरसोयीचा सर्वाधिक त्रास महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना सहन करावा लागत आहे. प्रवाशांकडून तिकिटाचे पैसे घेणाऱ्या एसटी प्रशासनाला बसस्थानकात स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देता येत नाही का, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. प्रवाशांची ही गैरसोय दूर करण्यासाठी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून बसस्थानकात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top