नवीन बातम्या
महाविकास आघाडीच्या नगरसेविका आर्या प्रवीण जाधव यांची मागणी; दिवाळीत मुलांसाठी ‘अलबत्या गलबत्या’ नाटक मोफत दाखवा! मोबाईलच्या वाढत्या वापरातून मुलांना रंगभूमीकडे वळविण्यासाठी महापौर आणि आयुक्तांना निवेदन
‘व्होट बचाओ, देश बचाओ’ आंदोलनातून काँग्रेसचा एल्गार मतदानाचा अधिकार आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी पनवेलमध्ये निदर्शने; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी
हृदयाच्या मागील बाजूची १८ सेंटीमीटरची थायरॉईडची गाठ शस्त्रक्रियेद्वारे काढली मेडिकव्हर रुग्णालयात १० तासांची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी; दोन वर्षांपासून श्वासोच्छ्वासाच्या त्रासाने त्रस्त महिलेला दिलासा
पनवेलमध्ये आधुनिक क्रिकेट मैदानासाठी १.२६ कोटींचा प्रस्ताव! क्रिकेटला गतवैभव मिळवून देण्यासाठी नगरसेवक सुमित झुंजारराव यांचा पुढाकार; सात ते आठ संघांना सरावाची सुविधा मिळणार
प्रा. चंद्रकांत मढवी आणि गणेश कोळी यांना रामशेठ ठाकूर यांच्या शुभेच्छा
पनवेल एसटी स्थानकात पिण्याच्या पाण्यासाठी प्रवाशांची वणवण!
फेरीवाल्यांवर कारवाई, बड्या व्यावसायिकांना अभय का? लीना गरड यांचा महासभेत संतप्त सवाल
वडिलांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती, तर मुलाने युरोपमध्ये मिळवली मास्टर डिग्री; अहिरे कुटुंबाचा दुहेरी गौरव
सुवर्णकन्या सई कारंडेचा खारघर शिवसेनेतर्फे नागरी सत्कार राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई; पदाधिकाऱ्यांकडून कौतुकाची थाप

वडिलांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती, तर मुलाने युरोपमध्ये मिळवली मास्टर डिग्री; अहिरे कुटुंबाचा दुहेरी गौरव

4kNews कामोठे
हनुमंत अहिरे यांची पदोन्नती; सुपुत्र प्रतीकने मार्केटिंग विषयात संपादन केली पदव्युत्तर पदवी
पनवेल, दि. ३१ (संजय कदम) : पोलीस दलात प्रदीर्घ सेवा बजावणारे हनुमंत घनश्याम अहिरे यांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे. त्याच दिवशी त्यांचे सुपुत्र प्रतीक हनुमंत अहिरे याने युरोपमध्ये मार्केटिंग विषयात मास्टर डिग्री संपादन केली. पिता-पुत्राच्या या दुहेरी यशामुळे अहिरे कुटुंबात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



हनुमंत अहिरे यांची १९९४ मध्ये रायगड जिल्हा पोलीस दलात भरती झाली. रसायनी पोलीस ठाण्यातून सेवेला सुरुवात केल्यानंतर त्यांनी पनवेल तालुका, उरण आणि पनवेल शहर पोलीस ठाण्यांसह नवी मुंबईतील सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रशासन) कार्यालयात विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांना पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती मिळाली.



दरम्यान, प्रतीक अहिरे याने युरोपमध्ये मार्केटिंग विषयात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण सीकेटी महाविद्यालयात झाले आहे. वडिलांची पदोन्नती आणि मुलाचे परदेशातील शैक्षणिक यश एकाच दिवशी मिळाल्याने अहिरे कुटुंबासाठी हा दिवस संस्मरणीय ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top