पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः दारु पिण्यासाठी आरोपीने पैसे मागितले असता ते न दिल्याने आपसात संगनमत करून सदर रिक्षा चालकास मारहाण करून तसेच ब्लेडने चेहर्यावर वार करून त्याला जखमी केल्याची घटना रेल्वे स्टेशनच्या आवारात साई मंदिराजवळ घडली आहे.

रिक्षा चालक आशिक आलम शेख (35 रा.नवनाथ झोपडपट्टी) याच्याकडे चार अनोळखी इसमांनी दारु पिण्यासाठी पैसे मागितले असता त्याने त्यास नकार दिल्याने या चौघांनी संगनमत करून त्याला हाता चापट्याने मारहाण करून त्यानंतर ब्लेडने त्याच्या चेहर्यावर वार करून त्याला जखमी केल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
