4k समाचार दि. 30
पनवेल (प्रतिनिधी ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत पनवेल येथे वोकल फॉर लोकल या संकल्पनेवर आधारित खरेदी-विक्री प्रदर्शनाचे भव्य आयोजन रविवारी करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन वर्षा ठाकूर यांच्या हस्ते झाले.

भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने पनवेल शहरातील गोखले हॉलमध्ये भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभास आमदार प्रशांत ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ममता प्रीतम म्हात्रे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश भगत, माजी नगरसेवक अजय बहिरा, सुनील बहिरा, शहराध्यक्ष सुमित झुंझारराव, माजी नगरसेविका दर्शना भोईर, प्रीती जॉर्ज, सारिका भगत, नीता माळी, सुहासिनी शिवणेकर, सुरेखा मोहोकर तसेच रूपेश नागवेकर, स्वाती कोळी, मालवणकर, अश्विनी अत्रे, कल्पना पाटील, कोमल कोळी, ज्योती देशमाने आदी उपस्थित होते. या वेळी सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचेही थेट प्रक्षेपण सर्वांनी अनुभवले.

या प्रदर्शनातून स्थानिक उत्पादने, हस्तकला आणि पारंपरिक उद्योगांना प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला. महिलांच्या स्वयंसहाय्य गटांनी, स्थानिक उद्योजकांनी व कारागिरांनी आपल्या उत्पादनांचे आकर्षक स्टॉल्स येथे लावले होते. या उपक्रमामुळे स्थानिक उत्पादने व उत्पादकांना व्यासपीठ मिळाले असून वोकल फॉर लोकल या संकल्पनेला प्रत्यक्षात मूर्त स्वरूप मिळाल्याचे दिसले. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, महिला मोर्चाच्या पनवेल शहराध्यक्ष रूचिता लोंढे, कोमल कोळी यांच्यासह महिला पदाधिकार्यांनी संयोजक म्हणून परिश्रम घेतले.
