नवीन बातम्या
उत्तर रायगड जिल्हा भाजप कार्यकारणीची मासिक बैठक संपन्न
कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी प्रभाकर जोशी दाम्पत्याचा इस्कॉनतर्फे सन्मान
आमदार प्रशांत ठाकूर यांची महावितरण कार्यालयात धडक
खंडित वीजपुरवठ्याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारत व्यक्त केली नाराजी
बदलत्या काळातील पालकत्व”  या विषयावर बालरोग संघटनेतर्फे पालक शिक्षकांकरिता विशेष चर्चा सत्र
*वेदनामुक्त आयुष्याचा नवा प्रवास; मेडिकव्हरच्या ‘मुव्हमेंटम २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद*
धरणा गावातील गटारपाण्याच्या समस्येवर माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने तातडीने उपाययोजना
हंगरफ्रीवर्ल्ड’ उपक्रमाने दैनंदिन अन्न वितरण मोहिमेच्या परिवर्तनात्मक प्रभावावर प्रकाश
केडिऐजीबी ग्रुप आणि ओरायन मॉलच्या रक्तदान शिबीराला ऊदंड प्रतिसाद; २०५ पनवेलकरांनी केले रक्तदान
जलजीवन’ फेल ठरल्यानंतर सरपंचांच्या संकल्पनेतून चिंचवाडीचा पाणीप्रश्न सुटणार; माथेरानच्या कपारीत शोधला पाण्याचा स्त्रोत

शिर्डी साईबाबा मंदिराचे सीईओ श्री.गोरक्ष गाडीलकर यांची पनवेलच्या श्री.साईबाबा मंदिराला भेट


4kNews कामोठे दि. 23
पनवेल – शिर्डी साईबाबा मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री.गोरक्ष गाडीलकर यांनी पनवेलच्या श्री.साईबाबा मंदिराला भेट दिली.
यावेळी त्यांनी सद्गुरु श्री साई नारायण बाबा आश्रम,श्री भगवती साई संस्थान पनवेलच्या श्री.साईबाबा मंदिराची पाहणी केली.मंदिरातील श्री साईबाबा आणि नारायण बाबा यांचे दर्शन घेतले.यावेळी त्यांनी बोलताना,आपण सर्वजण एकाच परिवारातील आहोत.श्री साईबाबा यांचे कार्य आपण पुढे घेऊन चालत आहोत.तुम्ही कोणतीही सेवा करा, पण ती श्रद्धापूर्वक केली पाहिजे. शिर्डी येथे जगातल्या कानाकोपऱ्यातून साईभक्त दर्शनासाठी येतात.श्री साईबाबांची जे भक्त सेवा आणि भक्ती करतात, त्यांना निश्चितच आशीर्वाद मिळतो.मंदिराच्या एकूण कामकाजाबद्दल त्यांनी खूप समाधान व्यक्त केले.



श्री.साईबाबा मंदिराच्यावतीने
कोऑर्डिनेटर राम थदानी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गोरक्ष गाडीलकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचे स्वागत केले.यावेळी मंदिराविषयी सविस्तर माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top