नवीन बातम्या
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा

*कळंबोलीत पोलिओ लसीकरण दिन साजरा; नगरसेविका सौ. बायजा बारगजे यांच्या हस्ते उद्घाटन*

4kNews कामोठे दि. 30
*कळंबोली*:  ‘पोलिओ लसीकरण दिना’ निमित्त कळंबोली सेक्टर 10 येथील युपीएचसी सेंटरमध्ये विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेचे उद्घाटन नगरसेविका व आरोग्य समिती अध्यक्षा *सौ. बायजा बबन बारगजे* यांच्या हस्ते करण्यात आले. 


यावेळी सौ. बायजा बारगजे म्हणाल्या, “पोलिओमुक्त भारत घडवण्यासाठी 0 ते 5 वयोगटातील सर्व मुलांना पोलिओची 2 थेंब देणे अत्यंत आवश्यक आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना पोलिओ लस देण्यास कसलीही हेळसांड करू नये. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे.”



*उपस्थित मान्यवर*
उद्घाटन प्रसंगी नगरसेवक *रामदास शेवाळे*, भटके विमुक्त मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष *बबन बारगजे*, युपीएचसीचे वैद्यकीय अधिकारी *डॉ. अनिल पाटील* तसेच केंद्रातील इतर डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर्स उपस्थित होत्या.
डॉ. अनिल पाटील यांनी पोलिओ लसीकरणाचे महत्त्व व फायदे पालकांना समजावून सांगितले. युपीएचसी स्टाफने केंद्रात येणाऱ्या सर्व लहान मुलांना पोलिओच्या 2 थेंब पाजल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी सौ. बायजा बारगजे यांनी आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर्सच्या मेहनतीचे कौतुक केले. “पोलिओमुक्त कळंबोली” हे आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top