नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

शनिवारी नवीन पनवेलमध्ये गणेश मुर्ती स्थापना दिवस

पनवेल (प्रतिनिधी) नवीन पनवेल येथील अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ आणि प्रियदर्शनी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक ०१ फेब्रुवारी रोजी पीएल ५ नवीन पनवेल येथे माघी श्री गणेशोत्सव आयोजित करण्यात आला असून त्यानिमिताने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


  या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, माजी महापौर कविता चौतमोल, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ऍड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी नगराध्यक्ष सुनील घरत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगराध्यक्ष के. डी. म्हात्रे, माजी नगराध्यक्षा स्मिता वाणी, माजी पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत,  ज्येष्ठ नेते सी.सी. भगत, माजी नगरसेवक मनोज भुजबळ, संतोष शेट्टी, तेजस कांडपिळे, समीर ठाकूर, माजी नगरसेविका राजेश्री वावेकर, वर्षा नाईक, वृषाली वाघमारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

माघी श्री गणेशोत्सव निमित्त आयोजित करण्यात आलेल्या श्री पालखी, भजन, सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजक माजी नगरसेविका सुशीला जगदीश घरत, पनवेल वैद्यकीय सेलच्या डॉ. अस्मिता घरत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top