करंजा मच्छीमार बंदराच्या दुसऱ्या टप्प्यातील कामे, मच्छिमारांना डिझेल परतावा तसेच डिझेल कोटा मंजूर करण्याबाबत राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी भेट घेतली,

यावेळी उरण नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष जयविन कोळी,करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा, राजेश नाखवा, कैलास कोळी ,महेंद्र कोळी,विलास नाखवा आदी उपस्थित होते. यावेळी या विषयावर सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच या संदर्भात बैठक घेण्याचे नामदार नितेश राणे यांनी आश्वासित केले.
