कामोठे (4K News) समाजात महिलांनीही आत्मविश्वासाने आणि सहजपणे इंग्रजीत संवाद साधावा, मुलाखतीत आपली छाप पाडावी आणि सार्वजनिक ठिकाणी निर्धास्तपणे बोलावे, या उद्देशाने सागरभाऊ पाटील प्रतिष्ठान, कामोठे तर्फे एक विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

कामोठ्यातील मुली आणि महिलांसाठी खास तयार करण्यात आलेल्या या इंग्रजी बोलण्याच्या कोर्सद्वारे केवळ भाषा शिकवली जाणार नाही, तर आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासालाही चालना मिळणार आहे.
📌 या कोर्सचे ठळक वैशिष्ट्य :
दररोज इंग्रजी बोलण्याचा सराव ✨
शब्दसंपत्ती आणि व्याकरणातील सुधारणा 📖
मुलाखतीसाठी आवश्यक कौशल्ये 🎤
सार्वजनिक भाषणाचा आत्मविश्वास 🌟
फक्त ३०० रुपयांत दोन महिन्यांचे प्रशिक्षण, त्यासोबत मोफत वही व पेन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नोंदणीची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर असून, महिलांना हा सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन प्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे.
🌷 “इंग्रजी ही केवळ भाषा नसून आत्मविश्वास आणि संधींचे दार आहे, आणि हे दार महिलांसाठी खुलं करण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे,” असे आयोजकांनी सांगितले.
📞 संपर्क :
करण जगदाळे – 72081 23052
आलोक गुंड – 80970 01456
