नवीन बातम्या
Open Channels FM: Technology’s Fast Feedback Loop with Triumph of the Nerds, Agile AI, and WordPress Security
Open Channels FM: Topics in Tech Business, It’s Rinse and Repeat
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला

*खारघर हिल महापौर मॅरेथॉनच्या मार्गाची महापौर, आयुक्तांकडून पाहणी*



4kNews कामोठे  दि. 22

पनवेल, : येत्या रविवार, २३ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन’च्या पूर्वतयारीला वेग आला असून, आज महापौर नितीन पाटील, आयुक्त मंगेश चितळे यांच्यासह महापालिका अधिकारी व संबंधित यंत्रणांनी मॅरेथॉन मार्गाची पाहणी केली. देशातील पूर्ण ४२ किलोमीटर अंतराची पहिली हिल महापौर मॅरेथॉन म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जात आहे.



यावेळी अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, शहर अभियंता राजेश कर्डिले, मुख्यअग्निशमन अधिकारी प्रवीण बोडखे, आरोग्य विभागप्रमुख अनिल कोकरे,  प्रभारी अधीक्षक जितू मढवी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. मॅरेथॉन मार्गावरील स्वच्छता, सुरक्षितता तसेच पावसाळी हवामानाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा यावेळी आढावा घेण्यात आला. डोंगराळ भागातील संभाव्य दरड कोसळणे, दगड घसरणे, झाडे पडणे यांसारख्या जोखमींचा विचार करून आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच स्पर्धेच्या सुरळीत व्यवस्थापनासाठी स्वयंसेवक व सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. 



आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त AIMS प्रमाणकामुळे या मॅरेथॉनला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पुढील वर्षापासून या स्पर्धेला जागतिक स्तरावर अधिक व्यापक मान्यता मिळून देश-विदेशातील धावपटूंना आकर्षित करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या स्पर्धेमुळे पनवेल महानगरपालिकेची राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण होण्यास मदत होणार असून, ही बाब पनवेलकरांसाठी अभिमानाची आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर नितीन पाटील यांनी केले.


गर्दीच्या रस्त्यांऐवजी डोंगर, टेकड्या, हिरवळ आणि स्वच्छ हवेच्या सान्निध्यात धावण्याचा अनोखा अनुभव धावपटूंना या मॅरेथॉनच्या माध्यमातून मिळणार आहे. पनवेल हे रायगड, कोकण तसेच नाशिक विभागातील धावपटूंसाठी मध्यवर्ती व सोयीचे ठिकाण असल्याने इतर दूरच्या मॅरेथॉनच्या तुलनेत प्रवासाचा वेळ आणि खर्चही कमी होणार आहे. त्यामुळे धावपटूंनी ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन’ला पसंती द्यावी, असे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले.
*राष्ट्रीय स्तरावरील सहभाग*
10,000 खेळाडूंचे उद्दिष्टः महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमधून 10,000 धावपटूंना सहभागी करून घेण्यासाठी ध्येय निश्चित करण्यात आले आहे.



*स्पर्धेचे प्रकार*
42 कि.मी. फुल मॅरेथॉन, 21 कि.मी. हाफ मॅरेथॉन, 10 कि.मी. रन, 5 कि.मी. रन,
3 कि.मी. फन रन (दिव्यांग व्यक्ती, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिक)

*मार्गाची माहिती*
3 कि.मी. मॅरेथॉनसाठी मार्ग सेंट्रल पार्क ग्रामविकास भवन विश्वज्योत प्रीस्कूल यु टर्न ग्रामविकास भवन सेंट्रल पार्क
५ कि.मी. मॅरेथॉनसाठी मार्ग सेंट्रल पार्क ग्रामविकास भवन मुर्बी मेट्रो स्टेशन यु टर्न ग्रामविकास भवन – सेंट्रल पार्क
10 कि.मी. मॅरेथॉनसाठी मार्ग सेंट्रल पार्क ग्रामविकास भवन उत्सव चौक बेलपाडा मेट्रो स्टेशन – RBI कॉलनी मेट्रो स्टेशन यु टर्न बेलपाडा मेट्रो स्टेशन- उत्सव चौक ग्रामविकास भवन सेंट्रल पार्क
21 कि.मी. मॅरेथॉनसाठी मार्ग सेंट्रल पार्क
स्टेशन – RBI कॉलनी मेट्रो स्टेशन चाफेवाडी मेट्रो स्टेशन- उत्सव चौक ग्रामविकास भवन ग्रामविकास भवन उत्सव चौक बेलपाडा मेट्रो फणसवाडी यु टर्न RBI कॉलनी मेट्रो स्टेशन- बेलपाडा सेंट्रल पार्क



42 कि.मी. मॅरेथॉनसाठी मार्ग सेंट्रल पार्क ग्रामविकास भवन मुर्बी जंकशन यु टर्न- ग्रामविकास
भवन -उत्सव चौक – बेलपाडा मेट्रो स्टेशन- RBI कॉलनी मेट्रो स्टेशन चाफेवाडी – फणसवाडी यु टर्न -RBI कॉलनी मेट्रो स्टेशन- बेलपाडा मेट्रो स्टेशन- उत्सव चौक गोल्फ कोर्स रोड यु टर्न ग्रामविकास भवन – गुरुद्वारा – रांजणपाडा खारघर फुटबॉल स्टेडियम तळोजा जेल रोड टाटा मेमोरियल सेंटर यु टर्न-तळोजा जेल रोड – खारघर फुटबॉल स्टेडियम रांजणपाडा मुर्बी जंकशन- विबग्योर शाळा यु टर्न – मुर्बी जंकशन- रांजणपाडा – गुरुद्वारा – सेंट्रल पार्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top