4k समाचार
पनवेल, दि.28 (वार्ताहर) ः अज्ञात इसमाने एका महिलेचा गळा दाबून खुन करून तिचे दागिने लंपास केल्याची घटना पनवेल तालुक्यातील कुंडेवहाळ गावात घडली आहे.
संगीता नामदेव म्हात्रे (55 रा.कुंडेवहाळ) असे या मयत महिलेचे नाव असून त्या आपल्या घरी असताना कोणीतरी अज्ञात इसमाने चोेरी करण्याच्या उद्देशाने त्यांचा गळा दाबून खून केला

व घरातील सोन्याची चेन, सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याच्या अंगठ्या, सोन्यातील कानातले असा मिळून जवळपास 1 लाख 55 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलिसांची वेगवेगळी पथके आरोपींच्या शोधात रवाना झाली आहेेत. व काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

