महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला असून, महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महायुतीने 236 जागांवर विजय मिळवला, तर महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर यश मिळाले.

याच दरम्यान, नागपुरातील उमरेड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या संजय मेश्राम आणि भाजपचे सुधीर पारवे यांच्यात थेट लढत होणार असल्याचा अंदाज होता, परंतु भाजपचे बंडखोर उमेदवार प्रमोद घरडे यामुळे तिहेरी लढत झाली. दरम्यान, शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळावं अशी इच्छा व्यक्त केलीये.
