नवीन पनवेल येथील स्वरसंस्कार संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावर्षी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेमध्ये उत्तम यश मिळविले आहे.. यावर्षी विद्यालयाच्या ४१ मुलांना प्रथम श्रेणी व विशेष योग्यता श्रेणी मिळाली आहे अशी माहिती विद्यालयाच्या संचालिका ऍड. सुरेखा प्रशांत भुजबळ (संगीत विशारद) यांनी दिली

गेल्या १० वर्षापासून स्वरसंस्कार संगीत विद्यालय उत्तम विद्यार्थी घडवत आहेत. या विद्यालय अंतर्गत शास्रीय गायनासोबत, सुगम संगीत, तबला, पेटी ई. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेनुसार शिकवले जाते. तसेच गिटार,पाश्च्यात्य नृत्य, भरतनाट्यम, अबॅकस तसेच योगा आणि झुंबाचे वर्ग घेतले जातात.१२५ पेक्षा अधिक विद्यार्थी या विद्यालयात गायन ,वादन ,नृत्य व अबॅकस,झुंबा ,योगावर्ग चा लाभ घेत आहेत .

विद्यार्थांना मिळालेल्या यशाबद्दल सर्व पालकांनी स्वरसंस्कार विद्यालयाच्या संचालिका ऍड. सुरेखा प्रशांत भुजबळ यांचे भरभरून कौतुक केले व आभार मानले.
