नवीन बातम्या
उरण नगरपरिषदेत वारस हक्काने १९ सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती. २ वर्षांपासून प्रलंबित प्रश्न नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर यांच्या प्रयत्नामुळे मार्गी.
*सरगम लायन्स तर्फे तळोजा प्राथमिक शाळेत वाचनालय*
अभिनेते विकास वायाळ यांची दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या महाराष्ट्र प्रवक्तापदी निवड
क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांचा रोटरीतर्फे सन्मान
शिक्षक-पालक संघाची स्थापना; मानसी कोकीळ, मनीषा पाटील अध्यक्ष
पनवेलमध्ये भरपावसातही तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; देशभक्तीच्या जयघोषाने शहर दुमदुमले
सिडको अग्निशमन केंद्र खारघर  रेस्क्यू  वर्दी
संतोष पवार यांची पनवेल शहर जिल्हा काँग्रेस एससी विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन

काॅ.भूषण पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त नागरी गौरव सोहळा उत्साहात संपन्न




उरण दि २(विठ्ठल ममताबादे )दि ३१ जुलै रोजी काॅ भूषण पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त नागरी गौरव सोहळा जेएनपीटी मल्टीपर्पज हॉल उरण येथे मोठया उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास रायगड-नवी मुंबईतील समाजाचे बहुतांश नेते, सत्ताधारी आणि विरोधी पक्षातीलही उपस्थित होते.

त्यात माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी आमदार जयंतभाई पाटील, माजी आमदार मनोहरशेठ भोईर, माजी आमदार बाळूशेठ पाटील, अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथदादा पाटील,उद्योगपती जे.एम. म्हात्रे, कामगार नेते महेंद्रशेठ घरत, राष्ट्रवादी(श.प) प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर, जेएनपीएचे दोन्ही ट्रस्टी- दिनेश पाटील आणि रवि पाटील तसेच कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील नेते – डाॅ. डी. एल. कराड, काॅ टी. नरेंद राव यांचा समावेश होता.अध्यक्षस्थानी सुधाकर पाटील ((Ex IRS) होते.


काॅ भूषण पाटील हे अगदी सरळ- साधं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्याजवळ आलिशान गाडी नाही कि बंगला नाही. त्यांचा वावर नेहमी सर्वसामांन्यात आजही आहे.ते २२  वर्षे जेएनपीटीचे ट्रस्टी राहिले ,


तेही निष्कलंक, एकनिष्ठ आणि कडवे कम्युनिस्ट म्हणून ते सर्वांना सुपरिचित आहेत.मात्र कामगार, सामाजिक क्षेत्रात सर्व विचारधारा सोबत घेऊन आणि सर्वांचा सन्मान आणि व्यापक दृष्टीकोन ठेवून काम करायचे हे स्वागतार्ह तत्व त्यांनी सुरूवातीपासून अंगिकारले.म्हणूनच त्यांना समाजमान्यता मिळाली आणि या कार्यक्रमास दृष्ट लागावी असा प्रचंड प्रतिसाद लाभला.उरण-पूर्व विभागात २००६ साली एसईझेडचे संकट आले त्यावेळी त्यांनी या आंदोलनात स्वतःला झोकून दिले. २१/०६/२००६ रोजी कम्युनिस्ट नेते सिताराम येच्युरी यांच्या नेतृत्वाखाली कोकण भवनवर पहिला मोर्चा धडकला त्यात ते अग्रभागी होते.  पुढे हा प्रश्न संसदेत उपस्थित करण्यासाठी काॅ भूषण यांनी येच्युरींसोबत यशस्वी पाठपुरावा केला. उरण-पूर्व विभागातीलही आंदोलनात ते सहभागी राहिले.


काॅ. भूषण पाटील गौरव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेष्ठ पत्रकार जगदीश तांडेल यांनी केले. सन्मान पत्राचे वाचन कामगार नेते संतोष पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. प्रफूल वशेणीकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गौरव समितीच्या सर्व सदस्यांनी अतीशय मेहनत घेतली.एकंदरीत काॅ.भूषण पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त नागरी गौरव सोहळा उत्साहात, मोठया प्रतिसादात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top