4k समाचार
नवी मुंबई नेरुळ सेक्टर-१ मधील विघ्नहर्ता सोसायटीत राहणाऱ्या एका महिलेवर मोठे संकट कोसळले. घरात झोपलेल्या अवस्थेत अचानक छताचे प्लॅस्टर कोसळून त्या महिला जखमी झाल्या. जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत..
या घटनेमुळे पुन्हा एकदा सिडकोच्या धोकादायक घरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक घरे जुनी व जीर्ण झाल्याने अपघातांचा धोका कायम असल्याचे नागरिकांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
