4k समाचार
पनवेल | शहरात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतुकीसह जनजीवन विस्कळीत झाले आहे. नवीन पनवेलमधील बांठिया विद्यालयासमोरील रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली.

दरम्यान, करंजाडे वसाहतीतील पुनर्वसित १३५ जणांना तातडीने पनवेल महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सुरक्षित स्थलांतरित करण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला नागरिकांच्या निवाऱ्याची तसेच खाद्यपदार्थांची सोय करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.
