4k समाचार दि. 20
नवी मुंबई | शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. सध्या धरण ९६ टक्के भरले असून, पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने येत्या काही तासांत पाणीपातळी ८७.८५ मीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

परिस्थिती लक्षात घेता धरणाचे दरवाजे उघडून धावरी नदीकाठावर पाणी विसर्ग करण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीकाठच्या भागात अनावश्यक वावर टाळावा, असा सल्ला प्रशासनाने दिला आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने सांगितले की, ८८ मीटर पातळी राखण्यासाठी आवश्यकतेनुसार पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात येईल. त्यामुळे धरण परिसरातील गावकरी आणि नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
