पनवेल दि.२७(वार्ताहर): श्री सद्गुरु वामन बाबा महाराज पुरस्काराने बबनदादा पाटील यांना महाशिवरात्रीचे औचित्यसाधून सन्मानित करण्यात आले.

वैकुंठवासी श्री सद्गुरु वामन बाबा महाराज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे या सत्पुरुषांच्या आर्शिवादाने बबन दादा पाटील यांनी समाजाची बांधिलकी स्विकारून राजकीय व सामाजिक चळवळ जिवंत ठेवून शाळा कॉलेज निर्माण करून बहुजन समाजाला ज्ञानाचा मार्ग सुलभ करन्न सेवेच व्रत धारण केलं. त्यांनी ज्या गावात जन्म घेतला त्या मातीचे ऋण मानून श्री भगवान सिद्धेश्वराच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करून नवीन वास्तु निर्माण केली

त्याच्या अंगे असलेल्या कर्तबगारीने आणि जबाबदारीने तन मन धन समर्पण करून कार्य पूर्णत्वाला नेल्याबद्दल त्यांच्या सामाजिक आणि धार्मिक कार्याची जाणीव ठेवून तळोजा मजकूर ग्रामस्थांच्या वतीने श्री सद्गुरु वामनबाबा सेवा सन्मान पुरस्कार योगीराज यशवंत महाराज पाटील,ह.भ.प. रामदास बाबा पाटील,.ह.भ.प. लालचंद महाराज राजे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलास. यावेळी शिवसेना (उबाठा) उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, किर्तनकार धनाजीबुवा,.लालचंद्र महाराज,.श्रीकांत महाराज मोहोकर आदींसह हजारो ग्रामस्थ उपस्थित होते.
