4k समाचार
पनवेल दि. 4 (वार्ताहर): नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी आज सर्वपक्षीय कृती समितीची बैठक मुंबई येथे झाली. या बैठकीमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला येत्या तीन महिन्यांमध्ये नाव देऊन असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. यावर शिवसेनेचे उपनेते बबनदादा पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून शिवसेनच्या त्यागा मुळेच दि. बा पाटील यांचे नाव विमानतळाला लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत उपनेते बबनदादा पाटील म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचे ठरले असतानाही पनवेल-उरण तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांच्या भावना लक्षात घेत स्वतःचे वडील आणि शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मागे घेत विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर केला आणि त्याला पाठिंबा दिला. यासाठी शिवसेनेने मोठा त्याग केल्यामुळेच लोकनेते दि बा पाटील यांचे नाव विमानतळाला लागणार आहे. असे शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते बबनदादा पाटील म्हणाले.
