नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

*तळोजा मधील बी जी शिर्के कामगार वासहितमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट*


पनवेल दि.२७(वार्ताहर):  तळोजा येथील बी. जी. शिर्के कामगार वसाहती मध्ये महाशिवरात्री दिनी सकाळी सिलेंडर मधून झालेल्या गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत कामगारांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळताच कळंबोली येथील अग्निशमन दल जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन वेळीच आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.


  तळोजा फेज-२ मध्ये सिडको गृहनिर्माण प्रकल्पाचे काम शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत सुरु आहे. या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांच्या निवासासाठी लोखंडी पत्र्यांची घरे उभारण्यात आली आहेत. या ठिकणी सकाळच्या सुमारास झालेल्या सिलेंडर गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत पंधरापेक्षा अधिक घरे जळून खाक झाली.

या आगीत कामगारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान  झाले. आगीमुळे परिसरात मोठया प्रमाणात धूर पसरला होता. आगीत बहुतांश घरातील जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दल जवानांनी वेळीच तीन सिलेंडर बाहेर काढल्याने जीवितहानी टळली. तळोजा येथील बी. जी. शिर्के कामगार वसाहती मध्ये गॅस सिलेंडर मधून झालेल्या गळतीमुळे आगीची घटना घडल्याचे दिसून येते. या आगीत कामगारांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असून, कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे कळंबोली अग्निशमन केंद्राचे अधिकारी फतेसिंग गायकवाड यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top