नवीन बातम्या
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून ग्रीन पोलीस स्टेशन उपक्रमांतर्गत परिसरात वृक्षारोपण
पनवेल तालुका पोलिसांनी केली दंगा काबू योजनेची रंगीत तालीम
रेल्वेची धडक लागून अज्ञात इसमाचा मृत्यू ; पनवेल तालुका पोलिसांच्यामार्फत नातेवाईकांचा शोध सुरू
‘रयत’तर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी हृद्य सत्कार‘
गामी बिल्डरच्या बांधकामामुळे पिसार्वे गावाचा नैसर्गिक नाला धोक्यात; माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांचा इशारा
पनवेल एस.टी. डेपो परिसरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठवणूक आणि विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल, वाहन जप्त !
विजेच्या समस्येसंदर्भात महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची वीज वितरण कार्यालयाला धडक
गेल्या दोन महिन्यांपासून महिलेची हत्या करून पसार असलेल्या आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

पनवेल महापालिका निवडणुकीसाठी स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टी आक्रमक; सर्व निर्णयांचे अधिकार महेश साळुंखेंकडे

4kNews दि. 17

स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी पक्षाचे अध्यक्ष सागर भाई संसारे यांची भेट घेऊन पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीविषयी चर्चा केली. त्यावेळी सागर भाई संसारे यांनी पनवेल महानगरपालिकेच्या बाबतीत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार महेश साळुंखे यांना दिलेले आहेत.  महेश साळुंखे यांचा पनवेल महानगरपालिकेतील अनेक वॉर्डमध्ये जनसंपर्क आहे त्यामुळे त्यांच्याकडे अनेक राजकीय कार्यकर्ते हे उमेदवारीसाठी विचारणा करण्याकरता येत आहेत.  

महेश साळुंखे यांनी सांगितले की महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो जो आम्हाला सन्मानाची वागणूक देईल व सत्तेमध्ये योग्य प्रकारे वाटा देईल त्या गटाला आम्ही आमच्या पक्षाचा जाहीर पाठिंबा देउ नाहीतर आम्ही स्वबळावर आमचे उमेदवार पनवेल महानगरपालिकेमध्ये उभे करू अशा प्रकारची माहिती महेश साळुंखे यांनी दिलेली आहे. लवकरच याबाबत ते पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील रणनीती स्पष्ट करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top