धाकटाखांदा गावचे सुपुत्र व उत्कृष्ट क्रिकेटपटू आनंद माळी यांचा ५१ वा वाढदिवस उत्साहात साजरा

4kNews कामोठे
पनवेल, दि. १० (वार्ताहर) : धाकटाखांदा गावचे सुपुत्र व उत्कृष्ट क्रिकेटपटू आनंद अंबाजी माळी (भाई) यांचा ५१ वा वाढदिवस मित्रपरिवाराच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.


यावेळी संजय कामठे, मिलिंद पाटील, अविनाश माळी, आनंद धुरी तसेच सर्व मित्रमंडळींनी उपस्थित राहून आनंद माळी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त केक कापून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
उपस्थितांनी आनंद माळी यांच्या सामाजिक कार्याबरोबरच क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे कौतुक करत त्यांना निरोगी, दीर्घायुषी आणि यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top