नवीन बातम्या
आदिवासी समाजाच्या सेवेसाठी कटिबद्ध : आमदार विक्रांत पाटील
कामोठे च्या पाण्याचा जटिल प्रश्न सोडवण्यासाठी शेकाप कडून निवेदन
पाणी प्रश्न सोडवण्यासाठी शेकाप नेहमी नागरिकांच्या सोबत नागरिकांच्या आमरण उपोषणाल शेकाप चा जाहीर पाठींबा
धाकटाखांदा गावचे सुपुत्र व उत्कृष्ट क्रिकेटपटू आनंद माळी यांचा ५१ वा वाढदिवस उत्साहात साजरा
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोलीत विविध सामाजिक उपक्रम; मान्यवरांचा सत्कार
४० वर्षांच्या अन्यायाविरोधात हनुमान कोळीवाडा–नवीन शेवेतील ग्रामस्थांचा निर्धार; १५ ऑगस्टला जेएनपीएसमोर उपोषण
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण मधील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या जाहीर. उरण शहर संघटक पदी  विजय दिलीप जाधव, उपशहरप्रमुख पदी फते खान सोंडे व युवती सेना उरण तालुका संघटिका पदी कु. नेहा रुपेश भगत यांची नियुक्ती.
करंजाडेच्या विकासासाठी आणखी एक ठोस पाऊल!
*केदार भगत यांच्या पुढाकाराने कोळेश्वर विद्यामंदिरात रेनकोट व छत्री वाटप*
*आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडून आयोजनाचे विशेष कौतुक*
माची प्रबळगडावर रस्ता चुकलेल्या दोन अल्पवयीन पर्यटकांची सुखरूप सुटका.

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोलीत विविध सामाजिक उपक्रम; मान्यवरांचा सत्कार

4kNews कामोठे
पनवेल, दि. १० (वार्ताहर) : पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोली येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नगरसेवक रविंद्र भगत यांच्या आयोजनाखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक ८ चे उद्घाटन करण्यात आले. तसेच श्री कालभैरव मंगल कार्यालय येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमात कळंबोली गावचे सुपुत्र सुभाष पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच १३ व्या विद्यार्थी ऑलिंपिक्स राष्ट्रीय स्पर्धा २०२६ मध्ये कुस्ती या प्रकारात सुवर्णपदक पटकावून कळंबोली व रायगड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या पै. जीत जयंता पोपेटा यांचाही मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी पै. जीत पोपेटा यांच्या उल्लेखनीय यशाचे कौतुक करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेले आरोग्य व सामाजिक उपक्रम समाजोपयोगी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. 


कार्यक्रमास रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, मा.नगराध्यक्ष जे.एम . म्हात्रे, रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह स्थानिक नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top