नवीन बातम्या
संस्कृतीर दिशारीतर्फे ‘मैफिल-ए-अनुराग’चे आयोजन
शास्त्रीय गायन, वादन आणि कथक नृत्याची रंगणार सुरेल मैफल
न्यायदानाची प्रक्रिया केवळ कागदी नसून नैतिक मूल्यांवर आधारित:- माजी न्यायमूर्ती अभय ओक
कामोठ्यातील ‘एल. के. विवांता’च्या अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करा
महापौर नितीन पाटील, स्थायी समिती सभापती बबन मुकादम व स्वीकृत नगरसेवक परेश ठाकूर यांची आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे मागणी
पॅडेलमधील अव्वल खेळाडू आर्टुरो कोएलो, ऑगस्टिन तापिया यांची पनवेलमध्ये भेट. गोदरेज सिटीमध्ये भारतातील मोठ्या इनडोअर पॅडेल केंद्राचे उद्घाटन
मन्सूर पटेल यांची भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या ठाणे-नवी मुंबई विभागीय प्रमुखपदी नियुक्ती; लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा
महामार्गालगत विद्यार्थ्यांनी सांभाळली वाहतुकीची धुरा
वन डे ट्रॅफिक कॉप्स’ उपक्रमाला नावडेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
४८ लाखांच्या हायवा डंपरचा अपहार; एकावर गुन्हा दाखल
नवीन पनवेलमध्ये ‘एसटी स्मार्ट कार्ड’ शिबिराला ४०० नागरिकांचा प्रतिसाद
ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे सत्कार

 कुस्ती स्पर्धेत सीकेटी कॉलेजची प्रशंसनीय कामगिरी 

4k समाचार दि. 14

पनवेल (प्रतिनिधी) सोनू भाऊ बसवंत महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या मुंबई विद्यापीठस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  खांदा कॉलनी (अधिकारप्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी  उत्कृष्ट कामगिरी करत एक सुवर्ण पदक, एक रौप्य पदक आणि सहा कांस्य पदक मिळवून विजेतेपद  प्राप्त केले.

  त्याचबरोबर स्पर्धेत  रितिका कारंडे(७२ किलो खालील) सुवर्ण पदक, समीक्षा बोरगे (६२ किलो खालील) रजत पदक,  आदित्य पांडा(९७ किलो खालील) कांस्य पदक, नवीन डोंगरे (६५ किलो खालील) कांस्य पदक, समृद्धी जाधव(५५ किलो खालील) कांस्य पदक , अस्मिता मोरे (६५ किलो खालील) कांस्य पदक, दिशा घनवट (७६ किलो खालील) कांस्य पदक आणि दीपश्री म्हात्रे (७६ किलो खालील) कांस्य पदक या प्रमाणे पदक प्राप्त करून सांघिक द्वितीय विजेते पद मिळवले

 या स्पर्धेसाठी महाविद्यालयातील जिमखाना विभागाचे चेअरमन डॉ. व्ही. बी. नाईक, सहसंचालक प्रा. अनिल नाक्ती, प्रा. भरत जितेकर व प्रा. प्रतिज्ञा पाटील, कुस्ती प्रशिक्षक श्री. रूपेश पावशे यांनी विशेष मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल प्राचार्य प्रो.डॉ. एस. के. पाटील यांनी विद्यार्ध्यांचे आणि मार्गदर्शकांचे विशेष कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top