नवीन बातम्या
पॅडेलमधील अव्वल खेळाडू आर्टुरो कोएलो, ऑगस्टिन तापिया यांची पनवेलमध्ये भेट. गोदरेज सिटीमध्ये भारतातील मोठ्या इनडोअर पॅडेल केंद्राचे उद्घाटन
मन्सूर पटेल यांची भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या ठाणे-नवी मुंबई विभागीय प्रमुखपदी नियुक्ती; लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा
महामार्गालगत विद्यार्थ्यांनी सांभाळली वाहतुकीची धुरा
वन डे ट्रॅफिक कॉप्स’ उपक्रमाला नावडेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
४८ लाखांच्या हायवा डंपरचा अपहार; एकावर गुन्हा दाखल
नवीन पनवेलमध्ये ‘एसटी स्मार्ट कार्ड’ शिबिराला ४०० नागरिकांचा प्रतिसाद
ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे सत्कार
पनवेलमध्ये डेंग्यू-मलेरियाचा वाढता धोका; स्वाईन फ्लूबाबतही चिंता शिवसेना शिष्टमंडळाचे आरोग्य विभागाला १५ सप्टेंबरपर्यंत उपाययोजनांचे अल्टिमेटम
डान्सबारच्या मुद्द्यावर पनवेलच का लक्ष्य?
परिमंडळ १ व २ मधील बारच्या वेळांवरही प्रश्नचिन्ह; केवळ पनवेलचे नाव चर्चेत आणण्यामागे ‘बोलविता धनी’ कोण?
केएमबी ग्लोबल ह्युमॅनिटी फाउंडेशनचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम ;
१०० गरजू कुटुंबांना रेशन, १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य; २०० महिलांना साड्यांचे वाटप

नवीन पनवेलमध्ये ‘एसटी स्मार्ट कार्ड’ शिबिराला ४०० नागरिकांचा प्रतिसाद

4kNews कामोठे
पनवेल, दि.१ (वार्ताहर) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नवीन पनवेल शहर शाखेच्या वतीने ‘एसटी स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)’ शिबिराचे आयोजन करण्यात आले. विभागप्रमुख यतिन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या शिबिराला सुमारे ४०० नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 



शिबिराचे उद्घाटन जिल्हाप्रमुख दीपक निकम यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नोकरदारांसह नागरिकांनी सकाळपासूनच नोंदणीसाठी गर्दी केली होती. तांत्रिक पथकाच्या मदतीने सुमारे ४०० नागरिकांची अर्ज प्रक्रिया व नोंदणी पूर्ण करण्यात आली.
एसटी स्मार्ट कार्डमुळे प्रवाशांना रोख रकमेऐवजी डिजिटल पद्धतीने व्यवहार करता येणार असून, प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top