4kNews कामोठे दि. 22
पनवेल येथील इनरव्हील क्लब ऑफ पनवेल सिटीचा या सामाजिक संस्थेचा पद ग्रहण सोहळा नुकताच डिस्ट्रीक्ट 313 च्या माजी चेअरमन डॉ . सौ शोभना पालेकर यांच्या प्रमुख उपास्थितीत द्विपप्रज्वलन करून जगन्नाथ रथ यात्रेच्या शुभदिनी म्हणजेच 16 जुलै रोजी तथास्तु हॉल पनवेल येथे उत्साहात पार पडला . या शुभप्रसंगी सन्माननीय अतिथी सौ . अर्चना परेश ठाकुर तसेच सौ ममता प्रितम म्हात्रे यांच्या उपास्थितीने कार्यक्रमाची शोभा द्विगुणीत झाली .

सौ . शुभांगी दिक्षीत यांनी गणेश वंदना प्रस्तुत करून कार्यक्रमाची सुरवात केली तत्पश्चात येणाऱ्या आषाढी एकादशीचे औचित्य साधुन विठ्ठलनामाच्या भजनावर ताल धरून .कार्यकरिणी सदस्यांनी आपला उत्साह प्रस्तुत केला . तद्नंतर क्लबच्या मावळत्या अध्यक्षा सौ . सिंपल आंचलिया यांनी स्वागतीय भाषणात उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून, त्यांच्या 2025-26 या कार्यकाळात त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची माहिती पीपीटी च्या माध्यमातून सर्वासमोर प्रस्तुत केली . यात शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सराक्तीकरण अशा विविध विभागात त्यांनी केलेल्या एकूण 76 प्रोजेक्ट्स ची विस्तारीत माहिती दिली . त्यांना क्लबसाठी वर्षभरात केलेल्या कार्याची पोचपावती म्हणून डिस्ट्रीक्ट कडुन मिळालेल्या सन्मान पत्रांची तसेच पुरस्कारांची माहिती दिली व सर्वाचे आभार मानले .
तत्पश्चात नवीन अध्यक्षा सौ . स्नेहल कल्याणकर यांना शिष्टाचाराप्रमाणे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कॉलर व पीन प्रदान करून क्लबचा कार्यभार सोपविण्यात आला .

त्याचबरोबर वाईस प्रेसिडेंट सौ बिजल मिरानी, इमिडिएट पास्ट प्रेसिडेंट सौ . सिंपल आंचलिया, सेक्रेटरी सौ . विजयता कोठारी, खजिनदार सौ . ध्वनी तन्ना , आयएस ओ सौ . गौरी देसाई , एडिटर सौ. प्रतिभा डांगी, क्लब करसपॉडन्स सौ. दुर्गा चौधरी, जॉईट सेक्रेटरी सौ . अरुंधती बंडसोडे, अँडवायझर सौ . हेतल बालड व कार्यकारिणी सदस्या सौ . तनिषा चेतवानी, सौ . सिमरन सचदेव, सौ . शुभांगी दिक्षीत या सर्वांना पीन देऊन पदग्रहण करवण्यात आले . नवीन मेंमर्ब चे क्लबमधे स्वागत करण्यात आले .
नवनिर्वाचित अध्यक्षा सौ . स्नेहल यांनी सभागृहाला उद्देशून आपल्या भावना तसेच भविष्यात समाजकार्यासाठी व क्लबच्या उन्नतीसाठी त्यांनी आखलेला आराखडा उपस्थिता समोर मांडला . प्रमुख अध्यक्षा सौ . शोभना पालेकर यांनीदेखील मेंम्बर्सना क्लबच्या यशस्वी वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन करून शुभेच्छा व्यक्त केल्या . एडिटर सौ . प्रतिभा त्यांचे प्रथम बुलेटिन व सी.सी सौ . दुर्गा चौधरी यांच्या फेलोशिप डायरीचे अध्यक्षांच्या हस्ते विमोचन करण्यात आले . तसेच एडिटर व आयएसो ने क्लब मेम्बर्स साठी घेतलेल्या प्रतियोगितां मध्ये यश मिळवलेल्या मेम्बर्स ना पारितोषिक देऊन सम्मानीत करण्यात आले .

दरवर्षीप्रमाणे पेन येथील आई डे केअर या मतिमंद मुलांच्या संस्थेतील दोन मुलींच्या एका वर्षाच्या शिक्षणाची जबाबदारी सौ . स्नेहल व सौ . ध्वनी यांनी प्रत्येकी 15000 रुपये दानराशी देऊन उचलली. तसेच क्लबच्या सेक्रेटरी सौ . विजयता यांनी देखील पनवेल येथील तक्का परिसरात स्थित स्वप्नालय या मुलींसाठी कार्य करत असलेल्या आश्रमातील एका मुलीस शिक्षणाच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनविण्यासाठी . 6000/- हजार दानराशी दिली . आणखी एक कोतुकास्पद उपक्रम यावेळी राबवण्यात आला , विविध 20 प्रकारच्या फळझाडे व फुलझाडांच्या एकुण 500 बियांचे आलेल्या पाहुण्यांना तसेच क्लबमधील सदस्यांना वाटप करण्यात आले जेणेकरून प्रत्येकाच्या हातून वृक्षारोपण होईल व त्याचा पर्यावरणाला लाभ होईल. एवढ्यावरच न थांबता क्लबने आणखी एका सत्कार्यास आपला हातभार लावून कौतुकाची धाप मिळवली ते म्हणजे देशभरातील गौप्रेमींनी गौमातेला राष्ट्रमाता म्हणून दर्जा मिळावा यासाठी चालवलेल्या स्वाक्षरी अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून त्यांना पाठिंबा दर्शविला तसेच गौमातेप्रती असलेली आस्था प्रकट केली .
शेवटी सौ. बिजल मिरानी यांनी सर्व उपस्थित मान्यवर, क्लबचे सर्व सदस्य , पारिवारिक सदस्य सर्वाचे आभार मानत सौ . जया मंगलनी यांचे देखील सुत्रसंचालनाची जबाबदारी अत्यंत वेधक व उत्तमरित्या पार पाडल्याबदल आभार मानून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

