नवीन बातम्या
अभियंता प्रकोष्ठाच्या प्रदेश प्रभारीपदी आमदार प्रशांत ठाकूर भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर; पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन
जीवनगौरव पुरस्काराबद्दल ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा सत्कार पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने शासकीय विश्रामगृहात गौरव
नवीन शेवा व शेवा कोळीवाडा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार.
रेट्रोफिटिंग कामांचा थकीत निधी द्या; पाणीपुरवठा कंत्राटदारांचे आझाद मैदानात बेमुदत धरणे
४८ तासांत ६६ तोळे सोने हस्तगत; आरोपी सोलापुरातून ताब्यात
कर्ज देण्याच्या आमिषाने ऑनलाइन फसवणूक करणारी टोळी जेरबंद चार आरोपी अटकेत; ३.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त
जन्म-मृत्यू विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
माहितीच्या अधिकारात अपील करताच दाखला मिळाल्याचा अर्जदाराचा दावा
स्वरसंस्कार संगीत विद्यालयाचा १२वा वर्धापनदिन उत्साहात  गुरुपौर्णिमा उत्सवात विद्यार्थ्यांचा बहारदार कलाविष्कार
सोनसाखळी चोरीप्रकरणी दोन सराईत आरोपी अटकेत
७.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त; पाच गुन्ह्यांची कबुली

ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार
आमदार विक्रांत पाटील यांच्याकडून अभिनंदन

4kNews कामोठे

पनवेल, दि. २३ (वार्ताहर) : ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेतर्फे जाहीर करण्यात आलेल्या ‘पत्रकार प्रेरणा पुरस्कार २०२६’मध्ये पनवेलचे ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या सन्मानाबद्दल आमदार विक्रांत पाटील यांनी त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले. 



पत्रकारिता क्षेत्रातील प्रदीर्घ आणि उल्लेखनीय योगदानाची दखल घेत संजय कदम यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार सोहळ्यात त्यांना सन्मानित करण्यात आले. 



यावेळी आमदार विक्रांत पाटील यांनी संजय कदम यांच्या पत्रकारितेतील कार्याचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी सातत्याने केले असल्याचे त्यांनी सांगितले. 



याप्रसंगी माजी कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील, नगरसेविका स्नेहल ढमाले-पाटील, मोहिनीताई विक्रांत पाटील, श्री. ढमाले तसेच ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड्स सर्कलचे विश्वस्त गणेश कोळी व अॅड. मनोज म्हात्रे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top