पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा धामापूरकर यांना बढती


पनवेल, दि. 6(संजय कदम) ः पनवेल शहर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असणारे कृष्णा धामापूरकर यांना बढती मिळून ते पोलीस निरीक्षकपदी नियुक्त झाले असून त्यांना नवी मुंबई विमानतळ (इमिग्रेशन) या ठिकाणी कार्यरत राहणार आहेत. 


पनवेल शहर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत असणारे कृष्णा धामापूरकर यांना आज बढती मिळून पोलीस निरीक्षक पदी शासनामार्फत नियुक्ती करण्यात आली आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांनी विविध गुन्ह्याची उकल केली आहे. या त्यांना मिळालेल्या बढतीचे पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून छोट्या खानी कार्यक्रमात वपोनि नितीन ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. शेेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणारा एक उत्तम अधिकारी म्हणून कृष्णा धामापूरकर यांची आठवण सदैव राहील, असे गौरवोद्गाार यावेळी वपोनि नितीन ठाकरे यांनी काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top