नवीन बातम्या
अभियंता प्रकोष्ठाच्या प्रदेश प्रभारीपदी आमदार प्रशांत ठाकूर भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर; पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन
जीवनगौरव पुरस्काराबद्दल ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा सत्कार पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने शासकीय विश्रामगृहात गौरव
नवीन शेवा व शेवा कोळीवाडा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार.
रेट्रोफिटिंग कामांचा थकीत निधी द्या; पाणीपुरवठा कंत्राटदारांचे आझाद मैदानात बेमुदत धरणे
४८ तासांत ६६ तोळे सोने हस्तगत; आरोपी सोलापुरातून ताब्यात
कर्ज देण्याच्या आमिषाने ऑनलाइन फसवणूक करणारी टोळी जेरबंद चार आरोपी अटकेत; ३.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त
जन्म-मृत्यू विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
माहितीच्या अधिकारात अपील करताच दाखला मिळाल्याचा अर्जदाराचा दावा
स्वरसंस्कार संगीत विद्यालयाचा १२वा वर्धापनदिन उत्साहात  गुरुपौर्णिमा उत्सवात विद्यार्थ्यांचा बहारदार कलाविष्कार
सोनसाखळी चोरीप्रकरणी दोन सराईत आरोपी अटकेत
७.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त; पाच गुन्ह्यांची कबुली

खारघर हिल मॅरेथॉनला ९ हजार धावपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद


4kNews कामोठे
पनवेल, दि. २५ (प्रतिनिधी) : पनवेल महानगरपालिकेतर्फे आयोजित ४२ किलोमीटर अंतराच्या ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन’ला महाराष्ट्रभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे ९ हजार धावपटूंनी विविध गटांत सहभाग घेत खारघरच्या टेकड्यांवर उत्साहाचे वातावरण निर्माण केले. 



पहाटे ४.३० वाजता महापौर नितीन पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, मुख्य प्रवर्तक परेश ठाकूर, जिल्हाधिकारी किशन जावळे, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख, महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्यासह विविध पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मॅरेथॉनला सुरुवात झाली.



अभिनेता अंकुश चौधरी आणि आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांनी उपस्थित राहून धावपटूंचा उत्साह वाढविला. आंतरराष्ट्रीय ‘AIMS’ मान्यता मिळाल्याने या मॅरेथॉनला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, भविष्यात देश-विदेशातील धावपटूंना आकर्षित करण्यासोबतच खारघर-पनवेल परिसरातील पर्यटन व स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. 



दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सुमारे १०० जण सहभागी झाले. २१ किलोमीटर अर्धमॅरेथॉनमध्ये नऊ अंध धावपटूंनीही सहभाग नोंदविला.
प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, विद्यार्थी, शिक्षक तसेच लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. धावपटूंच्या सुरक्षिततेसाठी रुग्णवाहिका, डॉक्टर आणि फिजिओथेरपिस्टची आरोग्य यंत्रणा तैनात करण्यात आली होती. उत्स्फूर्त सहभागामुळे ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन’ हा पनवेल परिसरातील आरोग्य व क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाचा उपक्रम ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top