नवीन बातम्या
ड्राइव्ह सेफ ३६०’ अभियानातून रस्ते सुरक्षेचा संदेश
रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘मराठी माझी देवालाही आवडे’ कार्यक्रम संपन्न
रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत संतगीतांचा सुरेल सोहळा; महापौर नितीन पाटील यांचा सन्मान
तरुणी बेपत्ता; पनवेल तालुका पोलिसांकडून शोध सुरू
विजय साबळे बेपत्ता; कामोठे पोलिसांत नोंद
शिवसेनेच्या मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
१.२२ कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना परत
सात पोलीस ठाण्यांतील ४८ गुन्ह्यांची उकल; १४० मोबाईल, दागिने, आठ वाहने आणि रोकड हस्तांतरित
क्रांती सम्राट’च्या संपादिका दिपालीताई पारसकर यांना ‘न्यायसखी पुरस्कार’ महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते कळंबोलीत सन्मान
पनवेलमध्ये ३० हजारांच्या पितळी समयांची चोरी; एकाला अटक
‘गावाच्या विकासासाठी ग्रंथालय उभारणे आवश्यक’
डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन

चंदेरी किल्ल्यावर रस्ता चुकलेल्या तीन तरुणांची सुखरूप सुटका

4kNews कामोठे दि. 25

पनवेल : चंदेरी किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या तीन तरुणांचा डोंगरात रस्ता चुकल्याने ते भरकटले. मदतीसाठी त्यांनी ११२ क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून तिघांनाही सुखरूप गडाच्या पायथ्याशी आणले. 



वावंजे बिट निर्भया एमडीटीवर सकाळी ११.०८ वाजता चंदेरी किल्ल्यावर काही जण अडकल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) आनंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी, पोलीस हवालदार अमर भालसिंग आणि पोलीस नाईक मिलिंद जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.



ओम खिलारी, पार्थ कडवे आणि रूषिल वृंदावन हे कामोठे, पनवेल येथील रहिवासी ट्रेकिंगसाठी चंदेरी किल्ल्यावर गेले होते. डोंगरातील वाट चुकल्याने त्यांनी ११२ वर मदत मागितली. त्यानंतर रिटघर गावचे पोलीस पाटील दीपक पाटील तसेच सह्याद्री प्रतिष्ठान पनवेलचे दुर्गसेवक गौरव दरवडा, मयूर टकले व आदेश पाडेकर यांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. काही वेळातच तिन्ही तरुणांचा शोध लागला. त्यांना सुरक्षितपणे गडाच्या पायथ्याशी आणून कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांच्या तत्परतेमुळे तिघेही सुखरूप बचावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top