नवीन बातम्या
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी नेते रोहित ढाले पोलिसांच्या ताब्यात
‘बॉयलर इंडिया २०२६’चे उद्घाटन; २५० प्रदर्शकांचा सहभाग सात देशांतील कंपन्यांचे प्रतिनिधित्व; तीन दिवसांत १८ ज्ञानसत्रांचे आयोजन
Novamira vs WPVibe vs MCP Adapter vs Easy MCP AI: Which One Fits Your Site?
OpenStation Blog: What WordPress would have looked like in 1995
WordPress MCP Adapter Explained: What It Is, What It Exposes, and Your Options
Open Channels FM: Building Stability Through Diversification in Tech Careers
शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंचाचे आझाद मैदानात बेमुदत धरणे शाळा-महाविद्यालये बंद करण्याचे निर्णय मागे घेण्यासह मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची मागणी
मुंबई व MMR च्या विकासाच्या दिशेवर CREDAI-MCHI च्या वार्षिक सभेत चर्चा
रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी, विकासकांचा सहभाग; धोरणात्मक सुधारणा आणि शाश्वत विकासावर भर
जसखार ग्रामसुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी रंजीत पाटील, तर सेक्रेटरीपदी सुरज कडू

‘बॉयलर इंडिया २०२६’चे उद्घाटन; २५० प्रदर्शकांचा सहभाग सात देशांतील कंपन्यांचे प्रतिनिधित्व; तीन दिवसांत १८ ज्ञानसत्रांचे आयोजन


4kNews 14
मुंबई (अजित मोहिते) : नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन व संमेलन केंद्रात ८ ऑक्टोबर रोजी ‘बॉयलर इंडिया २०२६’ या तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात सात देशांतील २५० प्रदर्शक सहभागी झाले असून, औद्योगिक उष्णता, वाफ आणि ऊर्जा क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान सादर करण्यात आले आहे. 



उद्घाटनप्रसंगी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, नवी मुंबईच्या महापौर सुजाता सूरज पाटील, बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, कामगार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आय. ए. कुंदन, असंघटित कामगार विकास आयुक्त सुशील खोडवेकर यांच्यासह विविध शासकीय अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
८ ते १० ऑक्टोबरदरम्यान आयोजित या प्रदर्शनात बाष्पित्रे, इंधन ज्वलन प्रणाली, पंप, झडपा, पाणी शुद्धीकरण, स्वयंचलित नियंत्रण प्रणाली, प्रदूषण नियंत्रण आणि ऊर्जा कार्यक्षमता वाढविणाऱ्या तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्यात येत आहे. या प्रदर्शनाला ४० देशांतील २५ हजारांहून अधिक अभ्यागत भेट देतील, अशी आयोजकांची अपेक्षा आहे.



व्यावसायिक जुळवणीसाठी विशेष साधन
उष्णता व वाफ उद्योगासाठी प्रथमच विशेष व्यावसायिक जुळवणी साधन प्रायोगिक स्वरूपात सादर करण्यात आले आहे. या साधनाच्या मदतीने अभ्यागतांना त्यांच्या औद्योगिक गरजांनुसार संबंधित प्रदर्शक, उत्पादने आणि तंत्रज्ञान शोधता येणार असून, प्रदर्शनातील संबंधित दालनापर्यंत पोहोचण्यासाठीही मार्गदर्शन मिळणार आहे.



१८ ज्ञानसत्रांतून तंत्रज्ञानावर चर्चा
प्रदर्शनादरम्यान आयोजित १८ ज्ञानसत्रांमध्ये औद्योगिक ऊर्जा कार्यक्षमता, बाष्पित्रांची सुरक्षितता, पाणी व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण, स्वयंचलित यंत्रणा आणि स्वच्छ ऊर्जा यांसारख्या विषयांवर चर्चा होणार आहे. ‘बाष्पित्र अधिनियम, २०२५’ या विषयावरील विशेष सत्रातून बदलत्या नियमांची आणि औद्योगिक सुरक्षिततेची माहितीही दिली जाणार आहे.



ऑरेंजबीक एक्स्पोजचे व्यवस्थापकीय संचालक भानू राजगोपालन यांनी सांगितले की, औद्योगिक उत्पादनक्षमता वाढविणे, नवतंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आणि पर्यावरणपूरक उपाययोजनांना चालना देणे यासाठी हे प्रदर्शन महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे. उत्पादक, तंत्रज्ञान पुरवठादार, अभियंते आणि उद्योग प्रतिनिधींना व्यावसायिक संबंध दृढ करण्याची संधी यातून मिळणार आहे.



या प्रदर्शनाला महाराष्ट्र शासनाचा कामगार विभाग, राज्याचे वाफ बाष्पित्र संचालनालय, केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालय तसेच ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचे सहकार्य लाभले आहे. विविध औद्योगिक संघटनांनीही या प्रदर्शनाला पाठिंबा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top