4kNews कामोठे दि. 8
पनवेल (प्रतिनिधी) : पनवेल येथील सेंट विल्फ्रेड्स कॉलेज ऑफ लॉच्या अँटी-रॅगिंग समितीच्या सदस्यपदी ज्येष्ठ पत्रकार संजय चंद्रकांत कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ. अवनी मिस्त्री यांनी ६ ऑक्टोबर २०२६ रोजी नियुक्तीपत्राद्वारे ही नियुक्ती केली.

विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, सन्मानजनक व सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी अँटी-रॅगिंग समिती महत्त्वाची भूमिका बजावते. समितीच्या कामकाजात संजय कदम यांचा अनुभव, मार्गदर्शन व सहकार्य उपयुक्त ठरणार असल्याचे कॉलेज प्रशासनाने नमूद केले आहे.
रॅगिंगमुक्त कॅम्पसच्या उद्देशाने समितीच्या बैठका व विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल शिक्षण, सामाजिक व विद्यार्थी क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

