4kNews कामोठे
पनवेल, दि. 8(वार्ताहर) : गणेशोत्सवाच्या काळात पनवेल शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची पुनरावृत्ती आगामी नवरात्रोत्सव व दिवाळीतही करावी, अशी मागणी भाजप पनवेल शहर सरचिटणीस अमित ओझे यांनी केली आहे.

गणेशोत्सवात मुख्य बाजारपेठेतील पार्किंग व्यवस्था, तात्पुरते मार्गबदल, अतिक्रमण व बेकायदा पार्किंगवरील कारवाई तसेच महापालिका, लोकप्रतिनिधी व पोलीस प्रशासनातील समन्वयामुळे वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत झाल्याचे ओझे यांनी म्हटले.

नवरात्रोत्सव व दिवाळीत मुख्य बाजारपेठा, एसटी बसस्थानक परिसर आणि विविध खरेदी केंद्रांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेशोत्सवाप्रमाणेच आधीपासून ‘ट्रॅफिक व पार्किंग प्लॅन’ तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे व बेकायदा पार्किंगवर वेळेत कारवाई करून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

