4,kNews कामोठे
पनवेल, दि. 8 (वार्ताहर) : शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने कामोठे येथे ज्येष्ठ नागरिक स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यास कामोठेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, अपेक्षा आणि अनुभव जाणून घेण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि त्यांच्या अनुभवांना महत्त्व देण्याच्या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.

मेळाव्यास माजी केंद्रीय मंत्री अनंतराव गीते, उपनेते बबनदादा पाटील, मावळ लोकसभा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण, जिल्हाप्रमुख दीपक निकम, प्रवक्त्या सुवर्णा वाळुंज, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, भरत पाटील, महानगरप्रमुख ॲड. समाधान काशीद, गटनेत्या लीना गरड, नगरसेविका रितिक्षा गोवारी, मेघना घाडगे, विभागप्रमुख रामदास गोवारी यांच्यासह सदानंद शिर्के, यतिन देशमुख, विश्वास पेटकर, कैलास पाटील, ॲड. बालेश भोजने तसेच पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना व कार्यकर्ते उपस्थित होते.

